झटपट मारी गोल्ड बिस्कीट आईस्क्रीम 5 वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये रेसिपी
आपण ह्या आगोदर बर्याच वेगवेगळ्या प्रकारे आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहिले. आता आपण आईस्क्रीमचा हा एक निराळा प्रकार बघणार आहोत. आईस्क्रीम बनवण्याच्या अगोदर आपण बेस बनवला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम बनवता येतात.
आईस्क्रीम बेस बनवताना दूध व मारी गोल्ड बिस्किट वापरुन त्यापासून वनीला आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम, गुलकंद आईस्क्रीम, बटर स्कॉच आईस्क्रीम हे आपण कसे बनवायचे ते बघणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1 लिटर दूध
6-7 मारीगोल्ड बिस्किट
1/2 कप साखर
1) वनीला आईस्क्रीमसाठी 3-4 थेंब वनीला इसेन्स
2) स्ट्रॉबेरी आईस्क्रीमसाठी 1 टे स्पून स्ट्रॉबेरी पल्प
3) चॉकलेट आईस्क्रीमसाठी
1 टे स्पून कोको पावडर 1 टे स्पून चॉकलेट सॉस
4) गुलकंद आईस्क्रीमसाठी
1 टे स्पून गुलकंद 1 टे स्पून रोझ सीरप
5) बटर स्कॉच आईस्क्रीमसाठी
1 टे स्पून मध (हनी)
2 चिमुट यल्लो कलर
3-4 थेंब बटर स्कॉच इसेन्स
2 टी स्पून प्रोलाईन पावडर
प्रोलाईन पावडर कशी बनवायची येथे पहा: https://www.royalchef.info/2016/04/eggless-butterscotch-ice-cream-recipe-in-marathi.html
कृती: प्रथम प्रोलाईन पावडर बनवून घ्या.
दूध गरम करून 8-10 मिनिट आटवायला ठेवा. मिक्सरच्या भांड्यात मारी बिस्किट घेवून ग्राइंड करून त्याची पावडर करून घ्या. एका बाउलमध्ये बिस्किट पावडर व अर्धा कप दूध मिस्क करून घेवून आटवलेल्या दुधामध्ये बिस्किटचे बनवलेले मिश्रण हळू हळू घालून मिक्स करून 2 मिनिट मिश्रण गरम करून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून परत 2 मिनिट गरम करून विस्तव बंद करून भांडे खाली उतरवून थंड करायला ठेवा.
मिश्रण थंड झाल्यावर त्याचे वेगवेगळ्या 5 भांड्यात सम प्रमाणात मिश्रण काढून घ्या.
1) वनीला आईस्क्रीम बनवण्यासाठी: एक आईस्क्रीम भाग घेवून त्यामध्ये 3-4 थेंब वनीला इसेन्स घालून मिक्स करून बनवलेले मिश्रण एका प्लॅस्टिक बाउल मध्ये काढून फ्रीजर मध्ये 2 तास सेट करायला ठेवा.
2) स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवण्यासाठी: एक आईस्क्रीम भाग घेवून त्यामध्ये 1 टे स्पून स्ट्रॉबेरी पल्प घालून मिक्स करून मिक्सरमध्ये ब्लेण्ड करून प्लॅस्टिक बाउलमध्ये काढून फ्रीजर मध्ये 2 तास सेट करायला ठेवा.
3) चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी: एक आईस्क्रीम भाग घेवून त्यामध्ये कोको पावडर व चॉकलेट सॉस घालून मिक्स करून मिक्सरमध्ये ब्लेण्ड करून प्लॅस्टिक बाउलमध्ये काढून फ्रीजर मध्ये 2 तास सेट करायला ठेवा.
4) गुलकंद आईस्क्रीमसाठी : एक आईस्क्रीम भाग घेवून त्यामध्ये गुलकंद व रोझ सीरप घालून मिक्स करून मिक्सरमध्ये ब्लेण्ड करून प्लॅस्टिक बाउलमध्ये काढून फ्रीजर मध्ये 2 तास सेट करायला ठेवा.
5) बटर स्कॉच आईस्क्रीमसाठी : मध (हनी), यल्लो कलर, बटर स्कॉच इसेन्स चांगले मिक्स करून घ्या. मग मिश्रण प्लॅस्टिक बाउलमध्ये काढून त्यावर प्रोलाईन पावडर घालून फ्रीजर मध्ये 2 तास सेट करायला ठेवा.
आईस्क्रीम सेट झाल्यावर मस्त पैकी सर्व्ह करा.
The Marathi Language Video of this Recipe can be seen here: How To Prepare 5 Different Types of Mari Gold Ice Cream