2 चमचे तूपात गव्हाच्या पिठाचा बॉम्बे कराची हलवा रेसिपी
2 Chamche Tupat Gavhachya Pithacha Bombay Karachi Halwa Recipe In Marathi
गहू आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. तसेच गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
गव्हाच्या पिठासून आपण बॉम्बे कराची हलवा बनवू शकतो. बॉम्बे कराची हलवा बनवताना तूप जास्त प्रमाणात लागते पण आपण गव्हाच्या पिठापासून हलवा बनवणार आहोत तर त्यासाठी फक्त 2 चमचे तूप वापरुन बनवता येतो.
घरी अचानक पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला काही गोड खायचे मन झालेतर गव्हाच्या पिठापासून आपण झटपट व आकर्षक बॉम्बे कराची हलवा बनवू शकतो. दिसायला व टेस्टला अगदी टेस्टी लागतो. तसेच तो पारदर्शक असतो त्यामुळे आकर्षक दिसतो. आपण जेवण झाल्यावर स्वीट डिश किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video of this Wheat Flour Bombay Karachi Barfi can be seen on our YouTube Channel: Zatpat Wheat Flour Bombay Karachi Halwa Recipe
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1/2 कप गव्हाचे पीठ
1/2 कप कॉर्नफ्लोर
1 कप साखर
2 टे स्पून तूप
1 टी स्पून लिंबूरस
½ टी स्पून वेलची पावडर
1 टे स्पून मगज बी
2 टे स्पून ड्रायफ्रूट
2-3 थेंब हिरवा खायचा रंग
कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1/2 कप गव्हाचे पीठ व 1 1//2 कप पाणी घालून मिक्स करून एक तास झाकून ठेवा. मग एक तासा नंतर गव्हाचे पीठ बाउलमध्ये खाली राहील व पाणी वर येईल तेव्हा हळुवारपणे पाणी काढून टाका व गव्हाचे पीठ तसेच बाउलमध्ये राहू द्या. दुसर्या एका बाउलमध्ये कॉर्नफ्लोर व 1/2 कप पाणी घेवून मिक्स करून घ्या.
एका पॅनमध्ये साखर व 1/2 कप पाणी घेवून मंद विस्तवावर एक तारी पाक बनवून घ्या पाक बनत असताना लिंबूरस घाला. पाक झाला की विस्तव बंद करा. मग पॅनमधील पाकात हळू हळू भिजवलेले पीठ घालून मिक्स करा मग कॉर्नफ्लोरचे मिश्रण हलवून हळू हळू पॅनमधील पाकात ओतत हलवत रहा. मिश्रण चांगले ढवळून घ्या गुठळी होता कामा नये.
मग पॅन मंद विस्तवावर ठेवून मिश्रण घट्ट होईपर्यन्त हलवत रहा. मिश्रण घट्ट होत आलेकी त्यामध्ये साजूक तूप घालून मिस्क करून घ्या. मग त्यामध्ये वेलची पावडर, ड्राय फ्रूट, मगज बी व हिरवा रंग घालून मिक्स करून घ्या. आता मिश्रण घट्ट झालेकी विस्तव बंद करा.
एका स्टीलच्या प्लेटला किंवा ट्रेला तूप लावून मिश्रण प्लेटमध्ये काढून घेवून एक सारखे करून घ्या. वरतून थोडे ड्रायफ्रूट घालून सजवून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर मस्त चौकोनी वड्या कापून घ्या. मग डब्यात भरून ठेवा.
The Text Recipe of Bombay Karachi Halwa in English Language can be seen here: Wheat Flour Bombay Karachi Halwa