कुरकुरीत स्वीट कॉर्न स्टफ कबाब नाश्त्यासाठी रेसिपी इन मराठी
Crispy Sweet Corn Stuffed Kebab Recipe In Marathi
स्वीट कॉर्न आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतात. त्यापासून आपण निरनिराळ्या टेस्टी डीशेस बनवू शकतो. स्वीट कॉर्नचे सारण बनवून आपण त्याच्यापासून कबाब बनवू शकतो. अश्या प्रकारचे कबाब बाणवायला अगदी सोपे झटपट होणारे आहेत तसेच आपण नाश्त्याला किंवा किंवा कोणी पाहुणे येणार असतीलतर किंवा मुलांच्या पार्टील किंवा किटी पार्टीला बनवू शकतो.
स्वीट कॉर्नचे सारण बनवताना सर्व्ह साहित्य हे चमचमीत असे वापरले आहे. व त्याचे आवरण बटाटा वापरुन बनवले आहे. तसेच शालो फ्राय केले आहे त्यामुळे तेल सुद्धा कमी लागते व ते छान कुरकुरीत होण्यासाठी त्याचा गोल्डन रंग येण्यासाठी एक मस्त कोटींग दिले आहे तुम्ही पूर्ण विडियो बघितला तर तुम्हाला नक्की आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 3 जणासाठी
साहीत्य: सारणा करीता:
1 कप स्वीट कॉर्न दाणे (उकडून)
1/2” आल व 1 हिरवी मिरची कूटन
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून चाट मसाला
1 टी स्पून लिंबूरस
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
मीठ व साखर चवीने
साहीत्य आवरणासाठी:
3 मध्यम आकाराचे बटाटे
1 टे स्पून आल-हिरवी मिरची पेस्ट
1 टी स्पून लाल मिरची पावडर
2 टे स्पून तांदळाचे पीठ किंवा ब्रेड किंवा कॉर्नफ्लोर
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
मीठ चवीने
तेल शालोफ्राय करण्यासाठी
कोटींग करण्यासाठी 2-3 टोस्ट पावडर करून
कृती:
साराणासाठी: प्रथम स्वीट कॉर्न मक्याचे दाणे उकडून घ्या. आल-हिरवी मिरची कुटून घ्या. कोथबिर चिरून घ्या.
एका बाउलमध्ये उकडलेले मक्याचे दाणे, आल, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, चाट मसाला, लिंबुरस , साखर, मीठ, कोथबिर घालून मिक्स करून सारण तयार करून घ्या.
आवरणासाठी: बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. आल-हिरवी वाटून घ्या. कोथबिर चिरून घ्या.
एका बाउलमध्ये किसलेले बटाटे, आल-हिरवी मिरची पेस्ट, लाल मिरची पावडर, तांदळाचे पीठ व मीठ घालून चांगले मळून घ्या. 5 मिनिट तसेच बाजूला ठेवून त्याचे एक सारखे गोळे बनवून घ्या. एक गोळा घेवून त्याला वाटी सारखा आकार द्या. मग त्यामध्ये 1 टे स्पून स्वीट कॉर्नचे सारण भरून गोळा बंद करून थोडा चपटा असा आकार द्या. अश्या प्रकारे सर्व एकसारखे बनवून घ्या.
एका बाउलमध्ये 2-3 टोस्ट मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर करून घ्या. प्र्तेक गोळा घेवून टोस्ट पावडर मध्ये चांगला घोळून घ्या. सर्व्ह बाजूने टोस्ट पावडर लागली पाहिजे.
नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा. त्यावर थोडे तेल घालून कॉर्न कबाब ठेवून बाजूने थोडे तेल सोडून गोल्डन ब्राऊन रंगावर शालोफ्राय करून घ्या. मग उलट करून परत थोडेसे तेल सोडून दुसर्या बाजूनी सुद्धा गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्या.
गरम गरम मक्याचे कबाब म्हणजेच स्वीट कॉर्न स्टफ कबाब टोमॅटो सॉस किंवा केचप बरोबर सर्व्ह करा.
The Recipe of this Video can be seen here: Crispy Sweet Corn Stuffed Kebab For Kids Party Or Nashta