डिलीशियस आंब्याचे गोड आप्पे रेसिपी
Delicious Soft Sweet Mango Appe Recipe
आंबा हा फळांचा राजा त्याचा रंग व सुगंध आपल्याला मोहून टाकतो. आंब्यापासून आपण आता पर्यन्त बरेच पदार्थ पाहिले. आंबा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
आता आपण अजून एक छान आंब्यापासून बनवणार आहोत. आंब्याच्या रसापासून आपण आंब्याचे आप्पे बनवणार आहोत. आंब्याच्या रसापासून गोड आप्पे टेस्टी व छान मऊ लागतात. आपण जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणून किंवा नाश्त्याला किंवा सणवाराला सुद्धा बनवू शकतो. घरी पाहुणे येणार असतील तर आंब्याचे आप्पे ही एक निराळी डिश बनवता येते.
बनवण्यासाठी वेळ: 40 मिनिट
वाढणी: 14 बनतात
साहीत्य:
1 कप रवा
1/2 कप आंब्याचा पल्प
6 टे स्पून साखर
3/4 कप दूध
2 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
1/2 टी स्पून वेलची पावडर
1/2 टी स्पून इनो किंवा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर
2 टे स्पून साजूक तूप
2 टे स्पून तेल आप्पे पात्राला लावण्यासाठी
कृती: आंब्याचा रस काढून मिक्सरमध्ये ब्लेण्ड करून घ्या. एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये रवा, आंब्याचा पल्प, वेलची पावडर, डेसिकेटेड कोकनट, साखर व निम्मे दूध घालून मिक्स करून 10-15 मिनिट झाकून बाजूला ठेवा. आप्पे पात्राला तेल लावून घ्या.
मग झाकण काढा. रवा भिजल्यामुळे मिश्रण थोडे घट्ट होते मग बाकीचे राहिलेले दूध घाला. मिश्रण एक सारखे करून त्यामध्ये इनो घालून हळुवारपणे मिश्रण मिक्स करा.
आप्पे पात्र गरम झालेकी एक-एक टे स्पून मिश्रण घालून बाजूनी थोडे तेल सोडून आप्पे पात्रावर झाकण ठेवून 4-5 मिनिट मंद विस्तवावर ठेवा. 4-5 मिनिट झाल्यावर झाकण काढून आप्पे वर थोडे- थोडे साजूक तूप सोडा. परत 2-3 मिनिट झाकण ठेवून मंद विस्तवावर ठेवा.
आता झाकण काढून आप्पे उलट करून घ्या. आता एकाबाजूनी छान ब्राऊन कलर आला असेल. उलट करून 3-4 मिनिट मंद विस्तवावर ठेवा. मग आप्पे प्लेटमध्ये काढून घ्या. अश्या प्रकारे सर्व आप्पे बनवून घ्या.
गरम गरम आंब्याचे गोड आप्पे सर्व्ह करा.
The Recipe of this Video can be seen here: Sweet Delicious Suji Mango Appe
The text Recipe in English can be seen here: God Ambache Appe