निराळा स्पायसी आंबट गोड कैरीचा गुळांबा रेसिपी
Different Style Spicy Ambat God Raw Mango Kairicha Gulamba
जून महिना आला की बाजारात लोणचे किंवा साखरआंबा किंवा गुळांबा बनवण्यासाठी छान हिरव्यागार कैरी मिळते. मग आपण वर्षभर टिकणारे साखर आंबा किंवा गुळांबा बनवून ठेवतो.
कैरीही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. कैरीमध्ये विटामीन “C” भरपूर प्रमाणात असते.
कैरीचा गुळांबा बनवायला अगदी सोपा आहे तसेच झटपट होणारा आहे. कैरीचा गुळांबा बनवताना तोतापूरी कैरी वापरली आहे तसेच गूळ, लवंग, मिरे व वेलचीपावडर वापरली आहे. गुळांबा लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो. आपण चपाती बरोबर सर्व्ह करू शकतो. जेवाणात गुळांबानी छान चव येते कारण की त्याची चव आंबट गोड स्पायसी लागते. त्यामुळे तोंडाला छान चव येते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1 कप कैरीचा कीस
1 कप गूळ (किंवा त्यापेक्षा थोडा कमी)
1 टी स्पून तूप
4 लवंग
7-8 मिरे
1/2 टी स्पून वेलचीपावडर
कृती: कैरी धुवून, पुसून, साले काढून, किसून घ्या. गूळ चिरून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये लवंग व मिरे घालून कैरीचा कीस घालून थोडा गरम करून घ्या. मग त्यामध्ये गूळ घालून मिक्स करून मिश्रण घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. मिश्रण इतके घट्ट झाले पाहिजेकी गुळाचा पाक थोडा चिकट किंवा दोन तारी झाला पाहिजे.
कैरीचे मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून विस्तव बंद करा.
कैरीचा गुळांबा थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. पाहिजे तेव्हा काढून चपाती बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Raw Mango Gulamba recipe can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Style Tasty Spicy Raw Mango Gulamba