सहज सोपा अगदी निराळा बटाटा पुदिना पराठा मुलांच्या डब्यासाठी रेसिपी
Easy Different Style Batata Pudina Potato Mint Paratha For Kids Tiffin Recipe
आपण आलू पराठा म्हणजेच बटाट्याचा पराठा बनवतो त्यामध्ये एक थोडा निराळा पद्धतीने आपण आलू पराठा बनवू शकतो. बटाटा पुदिना पराठा हा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला मस्त आहे. मुले अश्या प्रकारचा बटाटा पुदिना पराठा अगदी आवडीने खातात. तसेच त्यांना भूक लागली तर अश्या प्रकारचा बटाटा पुदिना पराठा झटपट बनवून देता येतो.
बटाटा पुदिना पराठा बनवतांना गव्हाचे पीठ, बटाटे, आले-लसूण-हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, हळद, कसूरी मेथी, गरम मसाला वापरला आहे. पुदिना वापरल्यामुळे ह्या पराठ्याची टेस्ट निराळी लागते तसेच पुदिना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. त्याचा सुगंध आपल्याला मोहून टाकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 कप गव्हाचे पीठ
2 मध्यम आकाराचे बटाटे (उकडून)
1/2 कप पुदिना (धुवून चिरून)
1 टे स्पून हिरवी मिरची आले पेस्ट
1/4 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून हळद
1/2 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
1/4 टी स्पून आमचूर पावडर
1 टे स्पून तेल
तेल व तूप पराठे भाजण्यासाठी
कृती:
प्रथम बटाटे धुवून, उकडून, किसून घ्या. आल-हिरवी मिरची वाटून घ्या. पुदिना पाने धुवून चीरून घ्या.
एका बाउल मध्ये गव्हाचे पीठ, उकडलेला बटाटा, आल-हिरवी मिरची वाटण, लाल मिरची पावडर, हळद, आमचूर पावडर, गरम मसाला, पुदिना पाने, मीठ चवीने व तेल घालून चांगले मळून घ्या. मग त्यामध्ये 2 टे स्पून पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या. मळलेले पीठ 15 मिनिट झाकून ठेवा.
मग मळलेल्या पीठाचे एक सारखे गोळे बनवून घ्या. एक गोळा घेवून थोडासा जाडसर लाटून घ्या. तवा गरम करून त्यावर लाटलेला पराठा दोन्ही बाजूंनी छान खमंग तेलावर भाजून घ्या.
गरम गरम बटाटा पुदिना पराठा तूप घालून मग सर्व्ह करा. सर्व्ह करतांना टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.
The Video of this Recipe can be seen here : Easy Different Style Batata Pudina Potato Mint Paratha For Kids Tiffin Or Nashta