अमेझिंग घरगुती टिप्स आपली स्कीन व सौंदर्य वाढवण्यासाठी
चमकदार त्वचेसाठी रात्री झोपण्याच्या अगोदर ह्या चार टिस्प करून चमत्कारी फायदे बघा
For Glowing Skin Follow 4 Amazing Tips Before Sleeping In Marathi
आपण रात्री झोण्यापूर्वी ह्या 4ब्युटि टिप्स लक्षात घेवून केल्यास आपली स्कीन त्वचा नेहमी चमकदार व निरोगी राहील.
ब्युटि टिप्स झोपण्यापूर्वी करा चेहरा स्वच्छ धुवावा, डोळ्यांची काळजी, फेस पॅक, मॉइस्चराइज करायला विसरू नका.
आपण आपल्या स्कीनची काळजी घरीच घेतली तर अगदी महागड्या केमिकल युक्त प्र्साधनाची गरज सुद्धा पडणार नाही व आपली स्कीन छान नितळ व सुंदर दिसेल.
आपण नोकरी धंदा, शाळा, कामा निमित्त घरा बाहेर पडतो. घरा बाहेर पडले की आपल्या स्कीनवर हवेतील प्रदूषणाचा किंवा धुळीचा वाईट परिणाम होत असतो. आपण संध्याकाळी थकून भागून घरी येतो मग फक्त तोंड हातपाय धुवून आपण रात्री झोपलायला जातो. कारण आपल्याला तेव्हडी एनर्जी राहत नाही. पण आपण आपली रोजची सवय बदलून आपल्यासाठी 10 मिनिट वेळ काढला तर आपल्याला आपल्या स्कीनचे सगळे प्रश्न सुटलील व आपली स्कीन एकदम चमकदार व निरोगी होईल. पण हे आपण रात्री करणे गरजेचे आहे.
आपण पाहतो की बर्याच महिला घरा बाहेर पडण्या अगोदर आपल्या स्कीनची म्हणजेच त्वचेची खूप काळजी घेतात पण घरी आल्यावर शरीर थकल्यामुळे आपण परत आपल्या स्कीनची जेवहडी काळजी घ्यायला पाहिजे तेव्हडी घेत नाही. आपणाला माहीत असेलच आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या शरीराची इंद्रीय अगदी संथ गतीने काम करत असते त्यामुळे आपणाला सकाळी उठल्यावर फ्रेश ताजेतवाने वाटते. जर आपल्याला असे वाटत असेल की आपली स्कीन नेहमी निरोगी, ताजीतवानी व चमकदार दिसावी ग्लौइंग दिसावी तर ह्या टिस्प जरूर करा.
1) आपण रात्री झोपण्या अगोदर आपला चेहरा स्वच्छ धुवायला विसरू नका. त्यामुळे आपल्याला फ्रेश तर वाटतेच व आपली स्कीन निरोगी राहते. त्यामुळे स्कीन वरील धूल, चिकटपणा, हवेतील प्रदूषण, तेलकटपणा निघून जातो व आपली स्वच्छ होते. आपण ही पहिली टीप तर नक्की करू शकता.
2) हर्बल फेस पॅक वापरू शकता.
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून हर्बल फेस पॅक लावल्यानी स्कीन निरोगी होवून आपल्या स्कीनला पोषक घटक मिळतता. त्यामुळे आपल्या स्कीनला नक्कीच फायदा होतो. गरमीच्या सीझन मध्ये अश्या प्रकारचा फेस पॅक घरी सुधा बनवू शकतो. मुल्तानी माती, काकडी व चंदन पावडर ह्याचा पॅक बनवून आपण आपल्या चेहर्यावर लावू शकतो.
3) रात्री झोपण्यापूवी आपल्या डोळ्याची काळजी घ्या. जसे आपण आपल्या स्कीनची काळजी घेतो त्याच प्रकारे आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेतली तर आपले डोळे छान तेजस्वी दिसतील त्यामुळे आपल्या सौदर्यामध्ये अजूनभर पडेल.
रात्री झोपण्यापूर्वी डोळे स्वच्छ धुवून डोळ्याच्या स्कीनवर क्रीम लावून आय ड्रॉप घालायला विसरू नका. आपल्या डोळ्याचा खालचा भाग खूप संवेदनशील असतो त्यामुळे त्याची काळजी घेणे जरुरीचे आहे. आपल्या डोळ्याच्या खाली किंवा आजूबाजूला काळे डाग पडतात व सुरकुत्या येतात. त्यामुळे आपण जारी आपल्या स्कीनची काळजी घेतली तरी आपल्या डोळ्याचा खालील डागामुळे आपले सौदर्या खुलून येत नाही. तर झोपण्यापूर्वी क्रीम लावून आय ड्रॉप घालायला विसरू नका त्यामुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगली राहून दिवसभाराचा डोळ्यावरील ताण कमी होण्यास मदत मिळेल.
4) रात्री झोपण्या अगोदर आपल्या स्किनला मॉइस्चराइज करायला विसरू नका. प्र्दुषणामुळे आपली स्कीन ड्राय व निस्तेज बनते. तर रात्री झोपताना आपल्या शरीराला मॉइस्चराइज करा जर आपल्याला मॉइस्चरायझर घेणे शक्य नसेल तर साधा सोपा उपाय म्हणजे नारळाचे तेल लावून थोडे मालीश करा. त्यामुळे आपल्या शरीराला आवशक घटक मिळतात आपली स्कीन सॉफ्ट मुलायम व निरोगी बनून वेळेच्या अगोदर आपल्या स्कीनवर सुरकुत्या पडत नाहीत
वर सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा नक्कीच आपल्या स्कीनला त्याचा फायदा होईल.
The Video of this article can be seen here: For Glowing Skin Follow 4 Amazing Tips Before Sleeping