पोह्या पासून बनवा हेल्दी चटपटा लाजवाब नाश्ता मुलांसाठी रेसिपी
Healthy Chatpata Poha Flattened Rice Nashta For Kids Recipe
आपण महाराष्ट्रियन स्टाईल कांदा पोहे, बटाटा पोहे, मटार पोहे, सोडे पोहा असे नानाविध प्रकारचे पोहयाचे प्रकार बनवतो. आता आपण पोहे वापरुन एक जबरजस्त नाश्त्यासाठी डिश बनवणार आहोत.
पोहया पासून अश्या प्रकारची डिश बनवायला अगदी सोपी आहे. झटपट होणारी आहे. आपण अश्या प्रकारची डिश मुलांना डब्यात देवू शकतो किंवा नाश्त्याला किंवा जेवणात सुद्धा साईड डिश म्हणून बनवू शकतो.
पोह्या पासून बनवा हेल्दी चटपटा लाजवाब नाश्ता मुलांसाठी बनवताना त्यामध्ये पोहे, शिमला मिर्च, गाजर, कोबी, कांदा, कोथबिर, कसूरी मेथी, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चाट मसाला, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, मीठ व तिळची लाजवाब फोडणी देवून शालो फ्राय केले की अजून त्याची टेस्ट न्यारी बनते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 कप पोहे
2 टे स्पून दही
2 टे स्पून बेसन
1 टे स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
2 टे स्पून टोमॅटो (चिरून)
1 छोटी शिमला मिर्च (चिरून)
1 छोटा गाजर (चिरून)
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
1/4 टी स्पून कसूरी मेथी
1/2 टी स्पून चाट मसाला
1/2 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून चिली फ्लेक्स
मीठ चवीने
1/4 टी स्पून बेकिंग सोडा
1 टी स्पून तेल
फोडणी करीता:
1 टे स्पून तेल
1 टे स्पून तीळ
कृती:
प्रथम पोहे निवडून धुवून घेवून बाजूला 5-10 मिनिट बाजूला ठेवा. मग कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, गाजर चीरून, कोथबिर घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाउल मध्ये पोहे घेवून दोन टे स्पून पाणी घालूम मिक्स करा. मग त्यामध्ये दही, कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, गाजर, कोथबिर, लाल मिरची पावडर, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, गरम मसाला, चाट मसाला, चिली फ्लेक्स घालून मीठ चवीने मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये थोडे तेल व बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करून घ्या.
एका स्टीलच्या प्लेटला तेल लावून बनवलेले मिश्रण प्लेटमध्ये एकसारखे थापून घ्या. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात 3-4 ग्लास पाणी गरम करायला ठेवा. पानी गरम झाले की त्यामध्ये एक प्लेट ठेवून त्यावर बनवलेल्या मिश्रणाची प्लेट ठेवून भांड्यावर झाकण ठेवून 15 मिनिट वाफवून घ्या.
मग भांड्यावरील झाकण काढून प्लेट बाहेर काढून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर नाश्ता प्लेटमध्ये काढून घ्या.
एक नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर 1 टे स्पून तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 टे स्पून तीळ घालून त्यावर वाफावलेला नाश्ता ठेवून बाजूंनी तेल सोडून छान कुरकुरीत भाजून घ्या. मग उलट करून परत बाजूंनी थोडेसे तेल सोडून भाजून घ्या.
गरम गरम पोह्या पासून बनवलेला हेल्दी चटपटा लाजवाब नाश्ता मुलांना टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
The Recipe of this Video can be seen here : Healthy Chatpata Poha Flattened Rice Nashta For Kids Recipe