हेल्दि इन्स्टंट रवा उत्तपा मुलांच्या ड्ब्यासाठी नाश्त्यासाठी रेसिपी
Healthy Instant Rava Uttapam For Kids Tiffin Or Breakfast Recipe
हेल्दि इन्स्टंट रवा उत्तपा मुलांच्या ड्ब्यासाठी नाश्त्यासाठी बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. मुले अश्या प्रकारचा इन्स्टंट रवा उत्तपा अगदी आवडीने खातात. परत तो हेल्दि कारण की ह्यामध्ये आपण शिमला मिर्च, गाजर वापरले आहे. मुले भाज्या खायचा कंटाळा करतात तर अश्या वेळेस आपण विविध प्रकारच्या भाज्या वापरुन इन्स्टंट पदार्थ झटपट बनवून सर्व्ह करून शकतो. मुलांना भूक लागलेली असते मग ते मिनिटात अश्या प्रकारचा पदार्थ संपवून टाकतात.
इन्स्टंट रवा उत्तपा बनवतांना रवा, दही, कांदा, शिमला मिर्च, गाजर, टोमॅटो, कोथबिर, आल, हिरवी मिरची घालून बनवला आहे त्यामुळे अश्या प्रकारचा उत्तपा हेल्दि आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 2 जणासाठी
साहित्य:
1 बारीक रवा
2 टे स्पून दही
3/4 टी स्पून मीठ
1 मध्यम आकाराचा कांदा (उभा चिरून)
1/4 कप टोमॅटो (चिरून)
1/4 कप गाजर (चिरून)
1/4 कप शिमला मिर्च (चिरून)
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
1 टी स्पून आल (किसून)
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
7-8 कडीपत्ता पाने (चिरून)
तेल रवा उत्तपा भाजण्यासाठी
कृती: प्रथम रवा, दही, मीठ व पानी घालून मिश्रण थोडा वेळ भिजत ठेवा.
कांदा उभा पातळ चिरून घ्या. शिमला मिर्च, टोमॅटो, कोथबिर, हिरवी मिरची चिरून घ्या. गाजर किसून घ्या. आल चिरून घ्या.
रवा चांगला भिजल्यावर त्यामध्ये निम्मा कांदा, निम्मी शिमला मिर्च, निम्मा टोमॅटो, निम्मी कोथबिर, निम्मे गाजर, हिरवी मिरची, कडीपत्ता, आले, अजून थोडे चवीने मीठ घालून अजून थोडे पाणी घालून मिश्रण थोडे सैलसर भिजवून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावून त्यावर थोडे मिशरण घालून पसरून घ्या. मग त्यावर थोडा उभा पातळ चिरलेला कांदा, थोडा टोमॅटो, थोडी शिमला मिर्च, थोडे गाजर घालून पसरवून घ्या. बाजूनी थोडे तेल सोडून छान भाजून घ्या. मग उलट करून परत बाजूनी तेल सोडा. अश्या प्रकारे दोनी बाजूनी छान कुरकुरीत भाजून घ्या.
गरम गरम झटपट क्रिस्पी इन्स्टंट रवा उत्तपा मुलांना टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
The recipe of this video can be seen here: Instant Crispy Healthy Rawa Uttapa