हेल्दि झटपट टेस्टी कुरकुरीत लाजवाब पार्टी स्टार्टर किंवा स्नॅक्स रेसिपी
Healthy Zatpat Tasty Spicy Party Starters Snacks For Kids New Recipes In Marathi
आपल्या घरी मुलांची बर्थडे पार्टी असते किंवा किटी पार्टी असते किंवा पाहुणे येणार असतील तर आपण नवीन प्रकारचे स्नॅक्स किंवा स्टार्टर किंवा नाश्त्याला किंवा ब्रेकफास्ट साठी काही नवीन प्रकार शोधत असतो.
आज आपण दोन प्रकारचे हेल्दि स्टार्टर किंवा स्नॅक्स बनवतांना भाज्या वापरुन कसे बनवायचे ते पाहू या. मुले भाजी खायचा कंटाळा करतात. प्रतेक आई मुलांनसाठी काही पदार्थ बनवताना ती कश्या प्रकारे हेल्दि बनेल ह्याचा विचार करत असते.
आपण प्रथम जे हेल्दि स्टार्टर किंवा स्नॅक्स बनवणार आहोत त्यामध्ये गव्हाचे पीठ व बटाटा वापरला आहे व ते खूप टेस्टी लाजवाब बनले आहे.
दुसर्या प्रकारात सुद्धा आपण गव्हाचे पीठ व भाज्या वापरल्या आहेत. भाज्या वापरुन सुद्धा हे हेल्दि स्टार्टर किंवा स्नॅक्स खूप टेस्टी बनले आहे आपण सुद्धा आपल्या चिमुकल्यासाठी अश्या प्रकारचे दोनी पदार्थ बनवून बघा नक्की आवडतील.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
1) पहिला प्रकार हेल्दि स्टार्टर किंवा स्नॅक्स साहीत्य:
सारणासाठी (स्टफिंगसाठी)
2 मध्यम आकाराचे बटाटे (उकडून, सोलून, किसून)
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1 छोटा कांदा (चिरून)
1 हिरवी मिरची (चिरून)
1/2” आल (किसून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून चाट मसाला
1 टे स्पून तीळ
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
मीठ चवीने
1 टे स्पून चटपटीत आलू भुजिया शेव
आवारणासाठी:
1 कप गव्हाचे पीठ
1/2 टी स्पून ओवा
मीठ चवीने
1 टे स्पून तेल
शालोफ्राय करण्यासाठी तेल
2) दूसरा प्रकार हेल्दि स्टार्टर किंवा स्नॅक्स साहीत्य
सारणासाठी (स्टफिंगसाठी):
1 टे स्पून तेल
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
1 हिरवी मिरची
1 1/2 कप भाज्या (शिमला मिर्च, कोबी, मटार, स्वीट कॉर्न,फ्रेंच बीन्स, गाजर)
1/2 टे स्पून सोया सॉस
1 टी स्पून मिरे पावडर
1/4 टी स्पून अजीनोमोटो
मीठ चवीने
आवारणासाठी:
1 कप गव्हाचे पीठ
1/2 टी स्पून ओवा
मीठ चवीने
1 टे स्पून तेल
शालोफ्राय करण्यासाठी तेल
कृती: 1) पहिला प्रकार हेल्दि स्टार्टर किंवा स्नॅक्स सारणासाठी (स्टफिंगसाठी): प्रथम बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या. आल किसून घ्या. कोथबिर व कांदा चिरून घ्या.
एका मध्यम आकाराच्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे व कांदा घालून गुलाबी रंगावर परतून त्यामध्ये हिरवी मिरची व आले घालून मिक्स करून लाल मिरची पावडर, गरम मसाला, चाट मसाला, तीळ व मीठ घालून मिक्स करून उकडलेले बटाटे कोथबिर घालून मिक्स करून सारण थोडे परतून घ्या. सारण बाजूला काढून ठेवा.
आवारणासाठी: गव्हाचे पीठ, ओवा, मीठ मिक्स करून घट्ट पीठ मळून 10 मिनिट बाजूला ठेवा. मळलेल्या पीठाची थोडी जाडसर चपाती लाटून घ्या. त्यावर बनवलेले सारण एक सारखे पसरवून आलू भुजीया शेव पसरवून चपातीचा घट्ट रोल बनवून घेवून त्याचे 1” चे तुकडे कापून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून थोडे तेल सोडून कापलेले तुकडे ठेवा बाजूनी थोडे तेल सोडून दोन्ही बाजूंनी छान खमंग कुरकुरीत शालोफ्राय करून घ्या.
2) कृती: दूसरा प्रकार हेल्दि स्टार्टर किंवा स्नॅक्स सारणासाठी (स्टफिंगसाठी): भाज्या, कांदा, हिरवी मिरची चिरून घ्या. भाज्या 2 मिनिट मंद विस्तवावर वाफवून घ्या.
एका कढईमद्धे तेल गरम करून कांदा, हिरवी मिरची थोडी परतून सोया सॉस व अजीनोमोटो घालून मीठ चवीने घालून वाफवलेल्या भाज्या घालून 2 मिनिट फ्राय करून घ्या. वरतून मिरे पावडर घालून मिक्स करून सारण बाजूला ठेवा.
आवारणासाठी: गव्हाचे पीठ, ओवा, मीठ मिक्स करून घट्ट पीठ मळून 10 मिनिट बाजूला ठेवा. मळलेल्या पीठाच्या छोट्या छोट्या पुर्या लाटून घेवून त्याला चौकोनी आकार देवून 1 टे स्पून सारण भरून बाजूनी मुडपून घ्या. मुडपताना बाजूनी मैदयाची पेस्ट लावा म्हणजे छान चिटकेल. आपल्याला पाहिजे तो आकार गोल, समोसा सारखा किंवा चौकोनी द्या. सर्व बनवून घ्या.
एका कढईमद्धे तेल गरम करून घेवून त्यामध्ये बनवलेले स्नॅक्स कुरकुरीत तळून घ्या.
आपले दोन्ही हेल्दि झटपट टेस्टी कुरकुरीत लाजवाब पार्टी स्टार्टर किंवा स्नॅक्स तयार आहेत आता टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.
The Video of this Recipe can be seen here: Healthy Zatpat Tasty Spicy Party Starters Snacks For Kids New Recipe