सहज सोपे सुंदर नाजुक मटकीला मोड कसे आणायचे इन मराठी
How to Sprout Matki Moth With cloth In Marathi
मटकीची आपण उसळ किवा आमटी बनवतो. ती मस्त टेस्टी लागते. मुलांना व मोठयाना सुद्धा मटकी आवडते. मटकी वापरताना गावरन व आकारान छोटी असलेली वापरावी म्हणजे त्याला छान नाजुक मोड येतात व चवीला सुद्धा मस्त लागते.
मटकी हे कडधान्य सर्वाच्या परिचयाचे आहे. मटकी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. मटकी थोडी वातूळ व रुक्ष असते. मटकी पीत्त-कफ, ताप, रक्तपिक्त, दाह, या रोगांवर गुणकारी आहे. जर शौशाच्या वेळी रक्त पडत असेल तर त्यामध्ये मटकीचे सेवन करणे हितावाह आहे. मटकीमध्ये लिसिथीनही म्हणजेच आपल्या मेदुषी निगडीत असणारे एक द्रव्य अधिक प्रमाणात असते. मटकी वायुहारक, जुलाबात गुणकारी, कफ व पित्तहारक, हलकी, कृमीकारक, व तापनाशक आहे.
मटकीला मोड कसे आणायचे ते आपण येथे पाहणार आहोत. बर्याच महिलांचे म्हणणे असतेकी मटकीला नाजुक असे मोड येत नाही. आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मटकीला सुंदर मोड आणू शकतो. त्यासाठी फक्त 3-4 स्टेप्स लक्षात घ्यायला पाहिजे.
थंडीच्या दिवसात मटकीला लवकर मोड येत नाहीत तर उन्हाळ्यामध्ये मटकीला चांगले मोड येतात पण त्याला थोडा दुर्गंध येतो. तर त्यासाठी आपण काय करायचे बघूया.
कृती:
एका भांड्यात 2 ग्लास पानी घेवून त्यामध्ये 1 कप मटकी घ्यावी, मग ती 2-3 वेळा चांगली धुवावी म्हणजे त्यावरील रासायनिक द्रव्य निघून जाईन व मटकी स्वच्छ हौईल. वर तरंगनारी मटकी काढून टाकावी. मग पूर्ण पाणी काढून टाकावे.
जेव्हडी मटकी घेतली आहे त्याच्या डबल कोमट पाणी घ्यावे. मग त्यामध्ये मटकी घालून 5-6 तास झाकून ठेवावी. साधारणपणे 1-2 वाजता मटकी भिजत घालावी व रात्री 8 वाजे पर्यन्त भिजत ठेवावी. मग रात्री एक चाळणी घेवून त्यावर एक मलमलचे कापड ठेवून त्यावर मटकी घालून सर्व पाणी काढून टाकावे येथे अजून एकदा मटकी स्वच्छ पाण्यांनी धुवावी म्हणजे मटकीचा उग्र दर्प नाहीसा होएल. मग त्याचा मलमलच्या कापडात मटकी घट्ट बांधून घ्यावी. अजून एक थोडे जाड कापड घ्यावे मग मलमलच्या कापडात बांधलेली मटकी त्या जड कापडात गुंडाळावी व बांधलेली पुरचुंडी भांड्यात झाकून ठेवावी. साधारणपणे 8 ते 10 तास मटकी तशीच भांड्यात ठेवावी म्हणजे त्याला छान सुरेख नाजुक मोड येतील.
मटकीला सहजसोपे मोड कसे आणायचे आहे ना अगदी सोपी पद्धत चलातर मग तुम्ही सुद्धा करून बघा.
The Video of this text can be seen here: How to Sprout Matki Moth With cloth