सर्दी खोकला झाला तर घरगुती रामबाण उपाय काढा बनवा
Kadha Traditional Home Remedy For Cold Cough And Fever in Marathi
जर हवामानात बदल झाला तर आपल्याला सर्दी खोकला होतो तसेच तापपण येतो. साधारणपणे पावसाळा किंवा हिवाळा ह्या दिवसात आपल्याला सर्दी खोकला होतो. आपण कामा निमिताने घरा बाहेर पडतो तर बाहेर दुषीत हवा, प्रदूषण, धूळ, धूर ह्यामुळे सुद्धा आपल्याला सर्दी खोकला होतो.
आपल्याला सर्दी खोकला झालकी आपण बाजारातून महागडी औषध किंवा कफ सिरप आणतो. पण आपल्याला लगेच त्याने बारे वाटत नाही. तेच जर आपण घरातील साहीत्य वापरुन घरगुती उपचार करून म्हणजेच रामबाण उपाय करून मस्त पैकी गरम गरम काढा बनवून घेतला तर आपल्याला लगेच बारे वाटते. करू बघा अगदी कमी खर्चात रामबाण उपाय.
The Marathi language video of this Home made remedy Khada can be seen on our YouTube Channel: Traditional Kadha For Cold Cough and Fever
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 1/2 ग्लास
साहीत्य:
1/2 टी स्पून ओवा
4 लवंग
3 छोटे तुकडे दालचीनी
1 टी स्पून बडीशेप
8-10 काळे मिरे
1/2” आल तुकडा
15 तुलसी पाने
1/2 टी स्पून हळद
2 हिरवे वेलदोडे
एक चिमुट काळे मीठ
2 टे स्पून गूळ
1 ग्लास पाणी
कृती: प्रथम खलबत्यामध्ये किंवा दगडीमध्ये लवंग, दालचीनी, मिरे, बडीशेप, ओवा थोडा जाडसर कुठून घ्या. मग आल थोडे कुटून घ्या.
एका स्टीलच्या भांड्यात एक मोठा ग्लास पाणी घेवून गरम करायला ठेवा. पाणी गरम झालेकी त्यामध्ये कुटलेले लवंग दालचीनीचे मिश्रण, कुटलेले आल घालून, तुळशीची पाने, घालून 10 मिनिट मंद विस्तवावर आटवत ठेवा. साधारणपणे आपण निम्मे आटवून घ्यायचे आहे.
मग त्यामध्ये हळद, वेलदोडे, घालून एक उकळी आलीकी गूळ व एक चिमुट काळे मीठ घालून एक मिनिट गरम करून घ्या. आता विस्तव बंद करून काढा गाळून घ्या.
गरम गरम काढा दिवसातून 3 वेळा 1 ते 2 टे स्पून मोठ्या माणसांनी घ्यायचा व लहान मुलांना 1 -2 टी स्पून दिवसातून 3 वेळा द्यायचा.