Delicious Mango Suji Ladoo Recipe In Marathi
डिलीशीयस मऊ लुसलुशीत आंबा रवा मॅंगो लाडू खाऊन बघा खातच राहाल
रवा आंब्याचे लाडू हे खूप टेस्टी लागतात. तसेच बनवायला अगदी सोपे असून आपण सणवाराला किंवा इतर दिवशी सुधा बनवू शकतो.
आपण ह्या आगोदर आंब्याच्या रसापासून विविध प्रकार बघितले आता आपण आंब्याच्या रसा पासून रवा आंबा लाडू कसे बाणवायचे ते बघू या. आंब्याचे लाडू छान चवीस्ट लागतात ते तोंडात टाकताच विरघळतात. दिसायला सुधा आकर्षक दिसतात.
रवा आबा लाडू बांवताना बारीक रवा वापरला आहे. त्यामुळे मस्त लुसलुशीत होतात. वरतून डेसिकेटेड कोकनट लावल्याने सुंदर दिसतात.
साहीत्य:
1 कप बारीक रवा
3 टे स्पून तूप
1 कप आंब्याचा पल्प
1/2 कप साखर
वेलची पावडर
ड्रायफ्रूट सजवटीसाठी
1/4 कप डेसिकेटेड कोकनट
कृती:
कढईमद्धे एक टे स्पून साजूक तूप गरम करून घेवून त्यामध्ये बारीक रवा घालून मिक्स करून परत एक टे स्पून साजूक तूप घालून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या.
आंब्याच्या पाळ्प काढून मिक्सरमध्ये ब्लेण्ड करून घ्या.
कढईमद्धे साखर व आंब्याचा पल्प मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. आपल्याला एक तारी पाक बाणवायचा आहे. एक तारी पाक बनवून झाला कीकी त्यामध्ये परत थोडेसे तूप घालून मिक्स करून भाजलेला रवा घाला. रवा व आंब्याचा पाक मिक्स करून मंद विस्तवावर 5 मिनिट आटवून घ्या. मिश्रम घट्ट झालेकी विस्तव बंद करा.
मिश्रण थोडे थंड झालेकी त्यामध्ये वेलची पावडर व ड्राय फ्रूट घालून मिक्स करून छोटे छोटे लाडू बनवून घ्या.
आंबा रवा लाडू बनवून झालेकी डेसिकेटेड कोकनट मध्ये घोळून घ्या. लाडू थंड झालेकी सर्व्ह करा.
The Recipe of this Video can be seen here : Maharashtrian Style Delicious Mango Suji Ladoo