महाराष्ट्रियन स्टाईल चमचमीत निराळी मक्याच्या कणसापासून पाटवडी रस्सा अशी कधी खाल्ली नसेल रेसीपी
महाराष्ट्रियन स्टाईल चमचमीत नवी निराळी मक्याच्या कणसापासून पाटवडी रस्सा
Maharashtrian Style New Different Sweet Corn Patwadi Gravy Rassa Recipe In Marathi
महाराष्ट्रियन लोकांची चमचमीत पाटवडी रस्सा ही खूप लोकप्रिय पारंपारिक डिश आहे. महाराष्ट्रा बरोबर ती बाहेर सुद्धा लोकप्रिय झाली आहे. चमचमीत पाटवडी रस्सा ही विदर्भ नागपूर ह्या भागात खूपच लोकप्रिय आहे. गरम गरम भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर त्याची टेस्ट न्यारीच लागते.
आता आपण चमचमीत पाटवडी रस्सा हा अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत. अश्या प्रकारचा चमचमीत पाटवडी रस्सा तुम्ही कधी चाखला नसेल बनवून बघा तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल.
चमचमीत पाटवडी रस्सा म्हणजेच स्वीट कॉर्न पासून बनवायला अगदी सोपा आहे. झटपट होणारा आहे. तसेच अगदी निराळा सुधा आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
पाटवडी बनवण्यासाठी:
1 मोठे ताजे स्वीट कॉर्न (किसून)
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1 टे स्पून आले-लसूण
मीठ चवीने
साहीत्य रस्सासाठी:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मेथ्या
2 तमालपत्र
1 मोठ्या आकाराचा कांदा (बारीक चिरून)
1 टे आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
2 टे स्पून दही
1 छोटा टोमॅटो (चिरून)
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1/4 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
2 टे स्पून फ्रेश क्रीम
कोथबिर चिरून
कृती:
पाटवडी बनवण्यासाठी: प्रथम स्वीट कॉर्न किसून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, आल-लसूण-हिरवी मिरची घालून थोडी परतून त्यामध्ये किसलेले स्वीट कॉर्न घालून घट्ट होईपर्यन्त शिजवून घ्या. मग त्यामध्ये मीठ घालून मिस्क करून घ्या. मिश्रण घट्ट झालेकी विस्तव बंद करून घ्या. एका स्टीलच्या प्लेटला थोडेसे तेल लावून त्यामध्ये घट्ट झालेले मिश्रण घालून एकसारखे थापून थंड करायला ठेवा. मग त्याच्या वड्या कापून घ्या.
रस्सा किंवा ग्रेव्हीसाठी: कांदा, टोमॅटोव कोथबिर चिरून घ्या. आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट करून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये मेथ्या व तमालपत्र घालून बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगवार परतून घ्या. कांदा परतलाकी आले-लसूण-हिरवी मिरची घाला. मग त्यामध्ये दही घालून तेल सुटे पर्यन्त परतून घ्या. लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर. मीठ घालून थोडे परतून आपल्याला जसा रस्सा हवा त्याप्रमाणात पाणी घाला पण जास्त पानी घालू नका. ग्रेव्हीला चांगली उकळी आलीकी फ्रेश क्रीम घालून एक सारखे करून स्वीट कॉर्नच्या बनवलेल्या पाटवडया घालून थोडे गरम करून घ्या. कोथबिरने सजवून घ्या.
गरम गरम महाराष्ट्रियन स्टाईल चमचमीत निराळी मक्याच्या कणसापासून पाटवडी रस्सा भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा
The Recipe of this Video can be seen here: Maharashtrian Style New Different Sweet Corn Patwadi Gravy Rassa