महाराष्ट्रीयन पारंपरिक पौष्टिक आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या
Maharashtrian Traditional Gulachya Kapanya
गव्हाचे पीठ व गूळ वापरुन छान खुशखुशीत कापण्या ह्या महाराष्ट्रातील पारंपारिक गोड डिश आहे. आषाढ महिना आलाकी अश्या प्रकारच्या पारंपारिक कापण्या बनवतात किंवा दिवाळीच्या सणाच्या फराळामध्ये सुद्धा बनवतात.
गव्हाचे पीठ व गूळ वापरुन बनवलेल्या कापण्या खूप पौस्टीक आहेत. तसेच छान टेस्टी लागतात. कापण्या बनवताना गव्हाचे पीठ, बेसन, गूळ, बडीशेप, खसखस, जायफळ व सुंठ पावडर वापरुन बनवले आहे. दुपारी चहा बरोबर सर्व्ह करायला छान आहे तसेच मुलांना डब्यात द्यायला किंवा नाश्त्याला द्यायला पण मस्त आहे.
The Marathi language video of this Ashad Special Gulachya Kapnya can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Traditional Wheat And Jaggery Kapanya
बनवण्यासाठी वेळ: 60 मिनिट
वाढणी: 5-6 जणासाठी
साहीत्य:
2 कप गव्हाचे पीठ
1 कप बेसन
1 1/2 कप गूळ
2 टी स्पून बडीशेप
1 टी स्पून सुंठ पावडर
2 टी स्पून खसखस
1/2 टी स्पून जायफळ
3 टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
1/4 टी स्पून बेकिंग सोडा
तेल कापण्या तळण्यासाठी
कृती: एका भांड्यात गूळ व 1/2 कप पाणी थोडेसे गरम करून विरघळवून घ्या. बडीशेप थोडेशी भाजून कुटून घ्या. जायफळ व सुठ पावडर करून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ व बेसन मिक्स करून घ्या. गुळाच्या पाण्यात कुटलेली बडीशेप, खसखस, जायफळ पूड, सुंठ पूड, बेकिंग सोडा, मीठ व गरम तेल घालून मिक्स करून पीठामध्ये ओतून मिक्स करून पीठ मळून घ्या. परत आजिबात पाणी घालायचे नाही गुळाच्या पाण्यातच मळून घ्यायचे आहे. पीठ मळून 5-10 मिनिट झाकून ठेवा.
मग मळलेल्या पिठाचे 3 एक सारखे गोळे बनवून घ्या. एका गोळा घेवून थोडा जाडसर पोळी सारखा लाटा व लाटलेली पोळी डायमंड शेपमध्ये थोड्या मोठ्या आकाराच्या कापून घ्या.
कढईमद्धे तेल चांगले गरम करून कापण्या टाळून घ्या. प्रथम विस्तव मोठा ठेवा कापण्या तेलात सोडल्यावर मध्यम आचेवर तळून घ्या. छान खुशखुशीत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व कापण्या तळून घ्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.