पंजाबी टेस्टी स्पायसी स्टफ शिमला मिर्च भाजी ड्ब्यासाठी
Punjabi Tasty Spicy Stuffed Shimla Mirch Capsicum Bhaji For Kids Tiffin
आपण शिमला मिर्चची भाजी कधी पंजाबी बटाटा, बेसन पेरून शिमला मिर्च, बेसन स्टफ किंवा आंबट गोड शिमला मिर्च अश्या विविध प्रकारे आपण शिमला मिर्चची भाजी बनवतो.
आता आपण अजून एक शिमला मिर्चची मस्त रेसिपी बघणार आहोत. ह्या मध्ये एका शिमला मिर्चचे दोन भाग करून बिया काढून त्यामध्ये मसाला भरून भाजी बनवायची.
पंजाबी टेस्टी स्पायसी स्टफ शिमला मिर्च बनवायला अगदी सोपी आहे. झटपट होणारी आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
250 ग्राम शिमला मिर्च (दोन भाग करून घ्या.)
1 टी स्पून तेल
सारणाकरीता:
2 टे स्पून तेल
1 टे स्पून आले-लसूण पेस्ट
1 मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)
1 टे स्पून टोमॅटो (चिरून)
1 टी स्पून चिली फ्लेस्क
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1/2 टी स्पून गरम मसाला
1/2 टी स्पून चाट मसाला
2 मध्यम आकाराचे बटाटे (उकडून, सोलून, किसून)
मीठ चवीने
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
कृती:
प्रथम शिमला मिर्च धुवून पुसून त्याचे दोन भाग कापून घ्या. आतील बिया व देठ काढून टाका. बटाटे उकडून, सोलून किसून घ्या. आले-लसूण वाटून घ्या, कोथबिर चिरून घ्या.
स्टफिंगसाठी: एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये आले-लसूण परतून चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. टोमॅटो थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चाट मसाला, मीठ घालून मिक्स करून किसलेला बटाटा घाला. मिस्क करून घ्या. 2-3 मिनिट सारण चांगले गरम करून घ्या, कोथबिर घालून मिस्क करा. आता बनवलेले सारण बाजूला थंड करायला ठेवा.
स्टफ शिमला मिर्च करीता: पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये दोन भाग केलेली शिमला मिर्च घ्या. मध्यम विस्तवावर शिमला मिर्च 2 मिनिट गरम करून घ्या. मध्ये मध्ये टॉस करा. दोन मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्या. विस्तव बंद करून शिमला मिर्च खाली उतरून घ्या.
दोन भाग केलेली शिमला मिर्च घ्या. त्यामध्ये एकेका भागा मध्ये बनवलेले सारण भरून घ्या.
पॅन गरम करायला ठेवा. पॅन गरम झालाकी त्यामध्ये एक टे स्पून तेल घालून भरलेली शिमला मिर्च ठेवा. पॅनवर झाकण ठेवून 2 मिनिट वाफवून घ्या. मग झाकण काढून शिमला मिर्च उलट करून घ्या. थोडेसे बाजूनी तेल सोडा. दुसर्या बाजूनी छान खरपूस भाजून घ्या. मग विस्तव बंद करून भाजी खाली उतरवून घ्या.
गरम गरम पंजाबी टेस्टी स्पायसी स्टफ शिमला मिर्च भाजी पराठा किवा चपाती बरोबर सर्व्ह करा.
The Video of this Recipe can be seen here : Punjabi Tasty Spicy Stuffed Shimla Mirch Capsicum Bhaji For Kids Tiffin