हॉटेल सारखी टेस्टी स्पाइसी स्वीट कॉर्न ग्रेवी करी रेसिपी इन मराठी
Restaurant Style Tasty Spicy Sweet Corn Gravy Curry Recipe In Marathi
आज काल आपल्याला बाजारात वर्षभर स्वीट कॉर्नची कणस मिळतात. त्यामुळे आपण मक्याच्या दाण्या पासून बरेच पदार्थ बनवू शकतो. ह्या अगोदरच्या विडियो मध्ये आपण स्वीट कॉर्न स्टफ कबाब व मक्याच्या दाण्यापासून पाटवडी कशी बनवायची ते पाहिले. आता आपण स्वीट कॉर्न ची ग्रेवी किंवा करी कशी बनवायची ते पाहू या.
स्वीट कॉर्न ग्रेवी बनवायला अगदी सोपी झटपट होणारी व खूप टेस्टी लागते. आपण घरी पाहुणे येणार असतील तर किंवा पार्टीसाठी अश्या प्रकारची अगदी हॉटेल सारखी स्वीट कॉर्न ग्रेव्ही घरी बनवू शकतो. गरम गरम पराठा किंवा चपाती बरोबर स्वीट कॉर्न ग्रेवी सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1 कप स्वीट कॉर्न दाणे
1 टे स्पून तेल
1 छोटी शिमला मिर्च लाल पिवळी हिरवी (चिरून)
1 छोटा टोमॅटो (चिरून)
1 टे स्पून बटर
1 टे स्पून फ्रेश क्रीम
मीठ चवीने
कोथबिर चिरून
स्वीट कॉर्न मसाला ग्रेव्ही करीता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1 मोठा कांदा (चिरून)
7-8 लसूण पाकळ्या
1” आल तुकडा
7-8 बदाम
1 मोठा टोमॅटो (चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1/2 टी स्पून धने-जिरे पावडर
कृती: स्वीट कॉर्नचे दाणे वाफवून घ्या. कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च व कोथबिर चिरून घ्या.
मसाला करीता: एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये आल-लसूण घालून एक मिनिट परतून घ्या. टोमॅटो घालून 1-2 मिनिट परतून घ्या बदाम घालून मग विस्तव बंद करा व मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
त्याच कढईमद्धे तेल गरम करून हिंग घालून शिमला मिर्च घालून थोडी परतून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो घालून थोडा मऊ झाला की वाटलेला मसाला घालून थोडा परतून घ्या. लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला व मीठ चवीने घालून मिक्स करून 1/2 वाटी पाणी घालून त्यामध्ये वाफवलेले मक्याचे दाणे व बटर घालून चांगली उकळी आणा. मग त्यामध्ये फ्रेश क्रीम व कोथबिर घालून मिक्स करून विस्तव बंद करून सर्व्हिंग बाउलमध्ये भाजी काढून कोथबिरने सजवा.
गरम गरम हॉटेल सारखी टेस्टी स्पाइसी स्वीट कॉर्न ग्रेवी करी पराठा किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.
The Video of this Recipe can be seen here: Restaurant Style Tasty Spicy Sweet Corn Gravy Curry Bhaji