उपवासासाठी शेंगदाण्याची काजू कतली बर्फी रेसिपी विडियो इन मराठी
Shengdana Kaju Katli For Fasting Recipe Video In Marathi
शेंगदाण्याची चिक्की बनवतो पण शेंगदाण्याची काजू कतली कशी बनवायची ते आपण आता पाहणार आहोत. शेंगदाण्याची काजू कतली बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. तसेच टेस्टी सुद्धा लागते.
शेंगदाण्याची काजू कतली बनवताना शेंगदाणे, काजू, मिल्क पावडर व साखर वापरली आहे. शेंगदाण्याची काजू कतली उपवासाच्या दिवशी किंवा सणावाराला किंवा दिवाळी फराळामध्ये सुद्धा बनवू शकतो. दिसायला आकर्षक आहे.
The Marathi language video of this Shengdana Kaju Katli For Fasting can be seen on our YouTube Channel: Shengdana Kaju Katli For Fasting or For Festival
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 250 ग्राम बनते
साहीत्य:
1कप शेंगदाणे
12 -15 काजू
1 कप साखर
1 टे स्पून मिल्क पावडर
1/2 टी स्पून वेलची पावडर किंवा 4-5 ड्रॉप रोज एसेन्स
1 टी स्पून पिठीसाखर
1 टी स्पून तूप पेपरला लावायला
कृती: प्रथम शेंगदाणे मंद विस्तवावर भाजून घ्या, पण भाजताना काळजी घ्या ते जास्त ब्राऊन भाजू नका त्यावर डाग येता कामा नये. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याची साल काढून टाका.
मग मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे व काजू बारीक वाटून घ्या.
कढईमध्ये एक कप साखर व 1/2 कप पाणी घेवून मंद विस्तवावर एक तारी पाक बनवून घ्या. मग साखरेच्या पाकात ग्राईंड केलेले शेंगदाणे व काजू घालून मंद विस्तवावर परत थोडे घट्ट होई पर्यन्त ठेवा. थोडे घट्ट व्हायला आलेकी मिल्क पावडर, वेलची पावडर घालून मिक्स करून मिश्रण थोडे घट्ट झालेकी विस्तव बंद करा. जर मिश्रण थोडे सैल वाटले तर एक टी स्पून पिठी साखर घालून चांगले मिक्स करा.
एका प्लॅस्टिकच्या पेपरला तुपाचा हात लावून तयार झालेले मिश्रण त्यावर घालून लाटण्यानी थोडे जाडसर लाटून घ्या. मग त्याच्या शंकरपाळी सारख्यावड्या कापून घ्या. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.