7 चमत्कारी फायदे गिलोय (गुळवेल) जूस सेवनाचे
7 Amazing Health Benefits Of Giloy Juice
गिलोय म्हणजेच मराठीमध्ये गुळवेल असे म्हणतात. आयुर्वेद च्या औषधामद्धे ह्या वनस्पतीला खूप महत्व आहे. गुळवेल ही वनस्पती कुठे सुद्धा उगवते म्हणजेच मोकळ्या जागेत मैदानात, रस्त्याच्या बाजूला, जंगलात, बगीचा, झाडांवर किंवा भिंतीवर सुद्धा येवू शकते. गिलोय (गुळवेल) चे वैज्ञानिक नाम ‘टीनोस्पोरा कार्डीफोलिया’ (Tinospora Cordifolia) आहे.
The Marathi language video of this Home Remedy Giloy Juice For Virus can be seen on our YouTube Channel: Home Remedies For Cold Cough Fever Giloy Juice
गिलोय (गुळवेल) च्या उगमा बद्दल सांगतात की समुद्र मंथनच्या वेळी अमृत कलश मधील काही थेंब जमिनीवर जेथे जेथे पडली तेथे तेथे त्याचा उगम झाला. त्यालाच अमृत वेल सुद्धा म्हणतात. आयुर्वेदमध्ये गिलोय (गुळवेल) हे खूप गुणकारी व उपयोगी आहे असे म्हणतात. सध्याच्या महामारीच्या काळात गिलोय (गुळवेल) चे जूस सेवन केल्याने खूप फायदा होऊ शकतो.
गिलोय (गुळवेल) च्या जूसचे नियमित सेवन केले तर ताप, फ्लू, डेंगू, मलेरिया, पोटातील किड्याच्या समस्या, रक्त दोष, लो ब्लड प्रेशर, हार्ट संबंधीत आजार, टिबी, मूत्र रोग, एलर्जी, पोटाचे आजार, डायबीटीस व त्वचा रोग ह्यावर गुणकारी आहे. गिलोय च्या सेवनाने भूक सुद्धा लागते. गिलोयमध्ये ग्लूकोसाइड (Glucoside) , गिलोइन (Giloin), गिलोइनिन (Giloininand), गिलोस्टेराॅल व बर्बेरिन (Berberine) अल्कली सारखे गुण आहेत.
आयुर्वेदमध्ये गिलोयचे खूप महत्वाचे स्थान आहे त्याच्या सेवनाचे खूप फायदे आहेत.
1) बुखार म्हणजेच ताप
गिलोयचे जूस रोज सेवन केल्याने ताप येण्याचे प्रमाण कमी होते. गिलोयचे जूस दिवसातून दोन वेळा 1-2 चमचे सेवन केल्याने ताप येण्याचे प्रमाण कमी होते. गुळवेलच्या पानाचा जूस काढू शकता किंवा बाजारात आपल्याला गुळवेल चे तयार जूस किंवा गोळ्या मिळतात. रोग प्र्तीकारशक्ती चांगली वाढते.
2) कावीळ:
कावीळ हा रोग असा आहे की त्यावर योग्य व पूर्ण डॉक्टरी इलाज केला नाही तर ती परत परत होते व ते आपल्याला घातक ठरू शकते. कावीळमध्ये डोळ्याच्या बरोबर आपली नख सुद्धा पिवळी होतात. आपल्या डॉक्टरी इलाज बरोबर गिलोय जूसचे सेवन केल्याने ताप सुद्धा कमी होतो.
3) डायरिया पासून बचाव
उन्हाळा ह्या सीझनमध्ये लोकांना डायरिया होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे शरीरातील पाणी खूप कमी होते. ह्या आजारामद्धे सारखे उलट्या व जुलाब होवून खूप अशक्त पणा येतो. अश्या वेळेस गिलोयच्या पानांचा जूस घेतला तर भरपूर प्रमाणात एनर्जी मिळते. व जुलाब होण्या पासून आराम मिळतो.
4) कैंसरच्या उपचारासाठी फायदेमंद
ज्या व्यक्तींना काही सुद्धा रोग नाही अश्या व्यक्ती गिलोय जूसचे सेवन करू शकतात. ज्यामुळे आपण बर्याच रोगापासून दूर राहू शकतो. ज्या व्यक्ती कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर उपचार घेत आहेत त्या व्यक्ती सुद्धा गिलोय जूसचे सेवन करू शकतात. गिलोय मध्ये एंटीकैंसर एक्टिविटीचे गुण आहेत जे कैंसरच्या उपचारासाठी मदत करतात. पण हे आपण डॉक्टरी सल्ला घेवून मग सेवन करावे.
5) बोन फ्रैक्चरसाठी फायदेमंद
काही वेळा अक्सीडेंटमुळे किंवा खेळतांना आपले हाड फ्रैक्चर होते तेव्हा गिलोयचा जूस घ्यावा व गिलोयच्या पान वाटून त्याचा लेप थोडासा गरम करून फ्रैक्चर झालेल्या जागेवर लावावा त्यामुळे दुखणे कमी होते. ज्यांना बोन फ्रैक्चरचा आजारा आहे त्यांनी गिलोयच्या जूसचे सेवन करावे.
6) एंटी एजिंगचे भरपूर गुण आहेत.
आपले वाढते वय सगळे जण लपवण्याचा प्रयत्न करत असतात. जर आपण आपल्या आहारा वर व व्यायामावर लक्ष केंद्रीत केले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. गिलोयमध्ये एंटीएजिंग एक्टिविटी आहे त्यामुळे गिलोयच्या जूसच्या सेवनाने वाढत्या वयामध्ये त्याचा खूप फायदा होतो.
7) मधुमेह डायबिटीज च्या रुग्णासाठी फायदेशीर
गिलोयमध्ये जिंक, पोटेशियम व एंटीऑक्सीडेंट आहे त्यामुळे मधुमेह असणार्या रुग्णांना गिलोयच्या जूस चे सेवन करणे फायदेशीर आहे. ब्लड शुगर लेवल कंट्रोल करते. ब्लड प्रेशर कंट्रोल करते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
गिलोयच्या जूसचे सलग खुपदिवस सेवन करू नये कारण की त्यामुळे ब्लड शुगर लेवल वाढू शकते. त्यामुळे मधून मधून शुगर लेवल तपासून पाहिली पाहिजे. व डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे.
गिलोयच्या जूसचे सेवन करणे हे फायदेशीर आहे पण आपले नेहमीचे औषध चालू ठेवून मगच ह्याचे सेवन करावे.