8 आश्चर्यकारक ओव्याचे फायदे केस स्कीन व आरोग्यासाठी
8 Amazing Benefits Of Ajwain Owa (Carom Seeds) For Our Health, Skin And Hair
The Marathi language video of this 8 Amazing Benefits Of Ajwain Owa (Carom Seeds) For Our Health, Skin And Hair can be seen on our YouTube Channel: Benefits of Carom Seeds For Our Health, Skin And Hair
मसाल्याच्या पदार्थामधील ओवा हा आपल्या सर्वाचा परिचयाचा आहे. घरगुती औषध म्हणून प्राचीन काळापासून ओव्याचा उपयोग केला जातो.
ओवा पाचक, रुची उत्पन्न करणारा, तीक्ष्ण, गरम, तिखट, हलका, जठरागन्नी प्रदीप करणारा, कडवट व पिक्तकारक आहे. वायु, कफ, पोट फुगणे, कृमी यावर ओवा गुणकारी आहे. तसेच ओवा हा वातनाशक, ताणनाशक, कृमी नाशक, अपचन, जुलाब, सर्दी यावर गुणकारी आहे.
ओव्याचा वापर औषधा बरोबर आपण पदार्थ बनवतांना सुद्धा करतो त्यामुळे आपल्या पदार्थाला छान टेस्ट येते व चांगला अरोमासुद्धा येतो. आपण पराठे, ब्रेड, व काही फळाच्या साठीसुद्धा वापरू शकतो त्यामुळे पदार्थ टेस्टी बनतो. ओव्यामध्ये बर्याच प्रमाणात फायबर, मिनरल, विटामीन व एंटीऑक्सीडेंट गुण आहेत. आपण नुसते चावून सुद्धा खाऊ शकतो त्यामुळे आपली पचनशक्ति सुधारते.
ओव्याचे औषधी गुणधर्म आपल्या केसानसाठी, स्कीनसाठी व आरोग्यासाठी काय आहेत ते आता आपण पाहू या.
1. पिक्त म्हणजेच Acidity किंवा अपचन Indigestion
पूर्वीच्या काळा पासून महिला स्वयंपाक करताना जेवणात ओवा वापरतात कारण ओव्यामध्ये असे गुणधर्म आहेत की त्यामुळे आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहून ते स्ट्रॉंग बनते पोटात गॅस होत नाही. एक चमचा ओवा, एक चमचा जिरे, 1/2 टी स्पून आले पावडर म्हणजेच सुंठ घेवून रोज पाण्या बरोबर घेतल्याने आपले आरोग्य उत्तम राहते, पचनशक्ति चांगली राहते व भूक लागते. ओव्याची पूड खावून त्यावर गरम पाणी पील्याने पोट दुखणे, अजीर्ण हे विकार दूर होतात. ओवा व गूळ खल्याने शीत पिक्त दूर होते.
2. सर्दी खोकला यासाठी रामबाण उपाय
ओव्याची पूड पाण्याबरोबर घेतल्याने सर्दी खोकला बरा होतो. ओवा खाल्याने शीत ज्वराच्या थंडीचा झोर कमी होवून घाम येतो व ताप उतरतो. गरम पाण्याबरोबर ओवा घेतल्याने श्वाशाचा जोर शांत होतो. हिचा फायदा अस्थमा किंवा ब्रोंकायटीस असणार्यांना सुद्धा होतो. जर माईगरेन नी डोक दुखत असेलतर एका रुमालात ओवा घेवून त्याची पुरचुंडी बांधून मधून मधून हुंगावी किंवा झोपताना उशीच्या खाली ठेवावी.
3. कान व दात ह्यासाठी गुणकारी
कान दुखत असेल तर 2 थेंब ओव्याचे तेल कानात घालतात पण हे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेवून करावे, दात दुखत असेलतर कोमट पाण्यात 1 चमचा ओवा व मीठ घालून मिक्स करून गुळण्या कराव्या. किंवा ओवा गरम करून त्याची वाफ तोंडात घ्यावी ह्याचा उपयोग माऊथ वॉश साठी सुद्धा होतो.
4. जखम बरी करण्यासाठी उपयुक्त
जर शरीरावर जखम झाली तर ओवा पाण्यात उकळून त्या पाण्याने जखम धुवावी. त्यामुळे आपली नाजुक त्वचा चांगली निरोगी राहते. ओव्याचे पूड करून सुद्धा लावू शकतो.
5. गर्भवती महिलासाठी ओवा उपयुक्त
बाळंतीन महिलेला ओवा सेवन करायला दिल्याने तिची पचनशक्ति सुधरूढ बनते. ताप येत असल्यास बारा होतो व तिला अंगावर दूध चांगले येते. बाळंतींनीच्या अंगावर ओवा चोळण्याची पद्धत आहे. जंतूचा नाश होण्यासाठी बाळंतीन महिलेच्या योनीमार्गात ओव्याची पुडी ठेवल्यास जंतूचा प्रवेश होत नाही व जंतूचा नाश होतो. किंवा योनि मार्गात धुरी सुधा देतात. 2 टी स्पून ओवा भाजून एक कप पाण्यात उकळून थंड करून गाळून त्यामध्ये एक टी स्पून मध घालून रोज घेतले तर शरीरातील चरबी कमी होऊन वजन कमी होते.
6. केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते
आजकाल प्रदूषण आपली बदलणारी जीवन शैली ह्यामुळे कमी वयातच केस पांढरे होतात, त्यासाठी एक सोपा घरगुती उपाय आहे. एक कप पाण्यात 5-6 कडीपत्ता पाने, 5-6 काळे मनुके एक टी स्पून ओवा व एक टी स्पून साखर घालून उकळून हे पाणी रोज सेवन करावे जो पर्यन्त आपल्याला ह्याचे चांगले रिझल्ट मिळत नाही तो पर्यन्त करावे.
7. स्वच्छ त्वचेसाठी:
ओव्याची पेस्ट करून स्कीनवर लावावी व 15 मिनिट तसेच ठेवून थंड पाण्यांनी धुवावी त्यामुळे आपली स्कीन स्वच्छ होवून दाग, पुळया व मळ निघून त्वचा स्वच्छ होते.
8. सांधेदुखीवर रामबाण ओव्याचा उपाय
संधिवातात आपले सांधे आखडतात तेव्हा ओव्याच्या तेलाने मालीश करावे. किंवा ओवा वाटून त्याची पेस्ट दुखणार्या संध्यावर लावावी त्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो.