जांभळाचे औषधी गुणधर्म व जामुन शॉट कसे बनवायचे रेसीपी विडियो इन मराठी
Amazing Health Benefits of Jamun And Jamun Shots Recipe Video In Marathi
The Marathi language video of this Amazing Health Benefits of Jamun And Jamun Shots can be seen on our YouTube Channel: Amazing Health Benefits of Jamun And Jamun Shots
जांभूळ हे एक उत्तम फळ आहे. हे फळ उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरवातीला येते. ग्रीष्मातील अमृत फळ जसे आंबा आहे तसेच जांभूळ हे पावसाळ्यातील अमृत फळ आहे.
जांभळाच्या रसानी सरबत बनवण्यात येते. या सरबताने पोटदुखी व पोटाचे विकार दूर होण्यास मद्त होते. लिव्हरच्या विकारावर जांभूळ हे गुणकारी आहे. हृद्यासाठी जांभूळ हे हितकारक आहे.
जांभळे पाचक व यकृतोत्तेजक असतात. जांभूळ हे अनेक रोगां वर गुणकारी आहे. लिव्हर बिघडल्याने शरीरात रक्तविकार निर्माण होतो. व त्यामुळे अनेकदा पांडुरोग व कावीळ होऊ शकते. ह्या मध्ये लोहाची खूप गरज असते. ते लोह जांभूळ खाल्याने मिळते व रोग बरा होतो.
मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी जांभळाच्या बियाचे चूर्ण हे अमृतसमान आहे. ह्या रुग्णांनी नेहमी जांभळाचे चूर्ण घ्यावे.
लहान जांभळे ही जुलाबात गुणकारी, कफ, पित्त, रक्तदोष तसेच दाह नाशक असतात. तसेच ती श्रम हारक, शीतल पाचक असतात.
जांभळे नेहमी जेवल्यानंतर नंतर खावीत, रिकाम्या पोटी कधी खावू नयेत. ती वात दोष निर्माण करणारी आहेत. ज्यांची वात प्रकृती आहे त्यानी कधी जांभळे खाऊ नयेत. ज्याच्या अंगावर सूज आहे, उलट्या होत आहेत, बालंत पणातून उठलेल्या स्त्रियांनी जांभळे खाऊ नयेत. जांभळा वर नेहमी मीठ टाकून खावे.
जांभळामध्ये लोह, फॉस्फरस व चुना विपुल प्रमाणात आहे. असेच फॉलिक असिडही आहे. तसेच जांभळे खाल्याने लघवी शुद्ध होते.
जांभळा पासून आपल्याला रायते, आईसक्रिम, मिल्कशेक, बनवता येते. कारण लहान मुले जांभळे खाण्यासाठी कंटाळा करतात. तर त्यांना जांभळा पासून काही पदार्थ बनवून दिले तर नक्की त्याच्या मुलांना उपयोग होईल.
5 मिनिटात बनवा जामुन शॉट
थंडगार जामुन शॉट आपण जेवण झाल्यावर किंवा संध्याकाळी सुद्धा सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 2 जणासाठी
साहीत्य:
20 जांभूळ
2 टी स्पून साखर
1 टी स्पून लिंबूरस
1/4 टी स्पून मीठ
1/4 टी स्पून काळे मीठ
1 1/2 मोठे ग्लास पाणी (थंड)
सजावटीसाठी:
मीठ व पुदिना पाने
कृती: प्रथम जांभळे स्वच्छ धुवून पुसून घ्या. मग त्यातील बिया काढून गर काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात जांभळागर, साखर, मीठ, काळे मीठ, लिंबूरस व 1/4 ग्लास पानी घालून ब्लेण्ड करून घ्या.
ब्लेण्ड केलेल जांभळाचे जूस एका भांड्यात काढून घेवून त्यामध्ये 1 1/4 मोठा ग्लास पाणी (एकूण 1 1/2 ग्लास पाणी) घालून मिक्स करून घेवून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
डेकोरेटीव्ह काचेचे ग्लास घ्या. एका बाउलमध्ये थोडे पाणी घ्या व दुसर्या छोट्या प्लेटमध्ये 1 टे स्पून मीठ घेवून पसरून ठेवा. एक ग्लास घेवून ग्लासची वरची बाजू पाण्यात बुडवून मग मिठाच्या प्लेट मध्ये ठेवा म्हणजे ग्लासच्या कडांना मीठ लागेल व आपला ग्लास छान दिसेल.
मग ग्लास मध्ये थंड झालेले जामुन शॉट ओतून वरतून पुदिना पाने घालून सजवून थंडगार जामुन शॉट सर्व्ह करा.