काळा दोरा शरीरावर बांधण्याचे चमत्कारी फायदे
Benefits Of Wearing Black Thread
ज्योतिष शास्त्रामध्ये काळा दोरा बांधण्याचे काही खास उपाय संगितले आहेत. आपल्या शरीरावर काळा दोरा बांधण्याने बरेच चमत्कारी फायदे होतात. आपल्या वातारणात व सभोवतालि बरीच नकारात्मक ऊर्जा असते ती ऊर्जा नष्ट करण्याची शक्ति काळ्या दोर्या मध्ये असते.
नुसतीच नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याच्या बरोबर त्याचे अजून फायदे आहेत. पण काळा धागा बांधण्याच्या अगोदर काही नियम पाळले पाहिजेत. काळा धागा का बांधवा तर वाईट नजरे पासून दूर, आरोग्यासाठी हितावह, आपले घर वाईट नजरे पासून वाचते, काळा धागा कधी बांधवा व त्याचे नियम काय आहेत.
The Marathi language video of this Benefits Of Wearing Black Thread can be seen on our YouTube Channel: Benefits Of Wearing Black Thread
काळा धागा शरीरावर बांधण्याचे फायदे असे आहेत.
वाईट नजर पासून वाचवण्याची शक्ति काळ्या धाग्यात आहे. काळ्या शक्त्ति पासून आपल्याला काळा धागा वाचवतो. खरम्हणजे काळा धाग्याचा व शनि ह्या ग्रहाचा संबंध आहे. असे म्हणतात की काळा धागा घातल्यावर कुंडली मधील शनि ग्रह मजबूत होतो. त्याच बरोबर शनि दोषापासून मुक्ति मिळते.
काळा धागा शरीरावर कधी बांधवा.
काळा धागा मंगळवार ह्या दिवशी बंधने फायदेशीर आहे. खरम्हणजे उजव्या पायावर मंगळवारी काळा धागा बांधणे शुभ मानले जाते. असे म्हणतातकी मंगळवारी काळा धागा बांधला की सुख समृद्धी प्राप्त होते व घरात धनाचा समावेश होतो.
काळा धागा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे.
काळा धागा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे ज्याच्या पोटात दुखत असते किंवा पोटाचे आजार आहेत त्यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधावा त्यामुळे त्यांना दुखण्या पासून आराम मिळू शकतो. खर म्हणजे ज्याची रोग प्रतीकर शक्ति कमी आहे त्यांनी काळा धागा जरूर बांधावा. त्यामुळे त्यांची शक्ति वाढते.
काळा धागा बांधल्या मुळे आपल्या घराला वाईट शक्ति पासून वाचवते. काळ्या धाग्यात लिंबू मिरची बांधल्यामुळे वाईट नजरे पासून आपले घर वाचते. बरेच जन आपल्या घरच्या मुख्य दरवाजाला काळ्या दोर्यात लिंबू मिरची बांधतात.
काळा धागा बांधण्या अगोदर काही सूचना लक्षात घ्या.
काळा दोरा बांधण्या अगोदर तो अभिमंत्रित केला पाहिजे
काळा धागा बांधण्या विषयी प्रथम आपण ज्योतिषीना विचारले पाहिजे व त्यांच्या कडून अभिमंत्रित करून घेतला पाहिजे
ज्या व्यक्ति काळा धागा बांधतात त्यांनी रुद्र गायत्री मंत्र ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥ ह्या मंत्राचा जाप केला पाहिजे.
एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या भागावर आपण काळा धागा बांधतो त्या भागावर दुसर्या रंगाचा दोरा बांधू नये.
काळा धागा शरीरावर बांधायचा असेल तर शनिवार ह्या दिवशी बाधणे शुभ असते.
शनिवारी काळा धागा शरीरावर बाधल्यामुळे धनवान बनू शकता.
काळा धागा शरीरावर बांधणे ही कल्पना फार पूर्वी पासून आहे. काळा धागा हातात, पायावर , दंडाला किंवा पायाच्या अंगट्याला बांधतात. खर म्हणजे काळा धागा बांधणे म्हणजे वाईट नजर पासून वाचवणे. काळा धागा बांधणे ह्याच्या मागे वैज्ञानिक कारण आहे.
आपले शरीर पंच तत्वांनी बनले आहे. पंचतत्व म्हणजे पृथ्वी, वायु, अग्नि, जल व आकाश होय. ह्या पासून आपल्याला ऊर्जा मिळते. खर म्हणजे आपल्याला दुसर्या व्यक्ति कडून वाईट शक्तिचा त्रास होत असतो त्या शक्तीला ही पंचतत्व सकारात्मक ऊर्जाने दूर ठेवत असतात. म्हणून गळ्यात काळा धागा बांधत असतात. काही जन काळ्या धाग्यात देवाचे लॉकेट घालून मग गळ्यात घालतात. ते शुभ मानले जाते.