सुंदर पौष्टिक बिना खवा दुधी भोपळ्याची मिठाई
Bottle Gourd Mithai Without Khoya And Condensed Milk
अगदी निराळी दुधी भोपळा मिठाई अशी बनवाल तर मिठाईच्या दुकानातील मिठाई आणायला नक्कीच विसराल
दुधी भोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. दुधी भोपळा पासून आपण भाज्या किंवा हलवा किंवा मिठाई बनवू शकतो. ह्या अगोदर आपण एक निराळ्या प्रकारची मिठाई बघीतली आता आपण अजून एक अगदी सोपी व सुंदर मिठाई बघणार आहोत.
दुधी भोपळा मिठाई बनवताना दुधी भोपळा, साखर व मिल्क पावडर पावडर वापरली आहे. अश्या प्रकारची मिठाई आपण सणवाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो.
The Marathi language video of this Bottle Gourd Mithai Without Khoya can be seen on our YouTube Channel: Bottle Gourd Mithai Without Khoya And Condensed Milk
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 12 – 14 पिसेस बनतता
साहीत्य: सारणा करीता:
1/2 वाटी साखर
1/2 वाटी पाणी
1/2 वाटी मिल्क पावडर
1/2 टी स्पून वेलची पावडर
2-3 थेंब ऑरेंज रंग
मिठाई करीता:
1 छोटा दुधी भोपळा
1 /2 वाटी साखर
2-3 थेंब हिरवा रंग
1/2 वाटी साखर
3/4 वाटी पाणी
सजावटी करीता:
पिस्ता, काजू, टुटी फ्रूटी
1/2 वाटी डेसीकेटेड कोकनट
कृती:
सारणाकरीता: एका पॅनमध्ये 1/2 कप साखर व 1/2 कप पाणी गरम करायला ठेवा. साखर विरघळलिकी त्यामध्ये मिल्क पावडर घालून मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. मिश्रण थोडे घट्ट झालेकी त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा.
मिठाई करीता: दुधी भोपळा धुवून घ्या. मग दुधी भोपळ्याची साल काढून त्याच्या गोल गोल 1/2” च्या चकत्या करून त्याचा मधील भाग काढून घ्या. मग एका भांड्यात 3-4 ग्लास पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झालेकी त्यामध्ये 1/2 टी स्पून बेकिंग पावडर व 2 चिमुट हिरवा रंग घालून मिस्क करून त्यामध्ये दुधी भोपळ्याच्या गोल चकत्या घालून झाकून 8-10 मिनिट शिजवून घ्या. मधून मधून चकत्या वरखाली करा. मग 10 मिनिट झाल्यावर विस्तव बंद करून चकत्या एका प्लेटमध्ये काढून घ्या.
दुसर्या एका भांड्यात 1/2 कप साखर व 1/2 कप पाणी घालून एक तारी पाक करून घ्या. मग त्यामध्ये दुधी भोपळ्याच्या चकत्या घालून मंद विस्तवावर 5-7 मिनिट शीजवून घ्या. 5-7 मिनिट झाल्यावर दूध भोपळ्याच्या चकत्या काढून एका प्लेटमध्ये ठेवा. थंड झाल्यावर दुधी भोपळ्याच्या मधल्या पोकळ भागात मिल्क पावडरचे सारण भरून घ्या.
सजावटीसाठी: दुधी भोपळ्याच्या मधल्या भागात मिल्क पावडरचे सारण भरून झाल्यावर एका प्लेटमध्ये डेसीकेटेड कोकनट घेवून त्यामध्ये एक एक दुधी भोपळ्याची चकती रोल करा अश्या प्रकारे सर्व दुधी भोपळ्याच्या चकत्या डेसीकेटेड कोकनटमध्ये रोल करून वरतून ड्रायफ्रूट व टुटी फ्रूटी सजवून सर्व्ह करा.