कुरकुरीत टेस्टी खेकडा भजी | कांदा भजी
Crispy Tasty Khekda Bhaji Or Kanda Bhaji
भजी म्हंटले की सगळ्यांच्या म्हणजेच लहान मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आपण नाश्त्याला किंवा सणावाराला अश्या प्रकारची भजी बनवू शकतो. खेकडा भजी ही फार पूर्वीच्या काळा पासून बनवली जातात.
खेकडा भजी बनवताना कांदा जास्त प्रमाणात वापरला जातो. म्हणून ह्याला कांदा भजी सुद्धा म्हणतात. भजी बनवताना पाण्याचा आजिबात वापर करायचा नाही म्हणजे मग ती मस्त कुरकुरीत बनतात.
The Marathi language video of this Khekda Bhaji can be seen on our YouTube Channel: Crispy Tasty Khekda Bhaji Or Kanda Bhaji
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 मोठ्या आकाराचे कांदे (उभे पातळ चिरून)
1/2 कप बेसन
2टे स्पून तेल (कडकडीत)
1हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1/4 टी स्पून बेकिंग पावडर किंवा 2 चिमुट बेकिंग सोडा
मीठ चवीने
तेल खेकडा भजी तळण्यासाठी
कृती: प्रथम कांदा उभा पातळ चिरून घ्या. हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
एका बाउलमध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घेवून त्यामध्ये लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, हळद, मीठ व गरम गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करून घ्या. मग झाकून 15 मिनिट बाजूला ठेवा.
15 मिनिटा नंतर झाकण काढून घ्या. कांद्याला चांगले पाणी सुटले असेल त्यामध्ये बेसन घालून चांगले मिक्स करून घ्या. पाणी आजिबात वापरायचे नाही.
कढईमद्धे तेल गरम करायला ठेवा. तेल चांगले गरम झालेकी त्यामध्ये भजाचे पीठ थोडे थोडे सोडा. मध्यम विस्तवावर गोल्डन रंगावर कांदा किंवा खेकडा भजी तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व भजी तळून घ्या.
गरम गरम भजी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.