हेल्दि रवा व शेवयाचे झटपट कटलेट रेसिपी
Healthy Zatpat Suji Sevai Veg Cutlet Recipe
रवा व शेवयाचा अश्या प्रकारचा हेल्दि नाश्ता आपण सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर अगदी झटपट पौस्टीक नाश्ता बनवू शकतो. लहान मुले व मोठे सुद्धा अगदी आवडीने खातात. तसेच आपण मुलांच्या पार्टीला किंवा घरी छोटी पार्टी असेल तर आपण अश्या प्रकारची डिश बनवू शकतो.
हेल्दि रवा व शेवयाचा झटपट नाश्ता बनवण्यासाठी रवा व शेवया वापरुन त्यामध्ये शिमला मिरच, कांदा, गाजर, टोमॅटो, कोथबिर, मिरे पावडर वापरली आहे. तसेच वरतून परत शेवया लावून डिप फ्राय केले आहे. त्यामुळे खूप आकर्षक दिसतात व टेस्टी सुधा लागतो.
The Marathi language video of this Suji Vermicelli Vegetable Cutlets can be seen on our YouTube Channel: Tasty Crispy Healthy Rava Sevai veg Cutlet
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1 कप रवा
3 टे स्पून किंवा 1/2 वाटी दही
2 टे स्पून पाणी
1 कप शेवया (शिजवून)
2 टे स्पून शिमला मिर्च (चिरून)
2 टे स्पून कांदा (चिरून)
1 छोटे गाजर (चिरून)
1 टे स्पून टोमॅटो
1/4 कप कोथबिर
1 टी स्पून चिली फ्लेस्क
1/4 टी स्पून मिरे पावडर
2 टे स्पून बेसन
1 टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने
सजवटीसाठी वरतून शेवया (कच्या)
तेल डिप फ्राय करण्यासाठी
कृती: एका बाऊलमध्ये रवा, दही व 2 टे स्पून पाणी घालून मिक्स करून 10-15 मिनिट झाकून ठेवा. शेवया शिजवून घ्या. कांदा, शिमला मिर्च, कोथबिर चिरून घ्या. गाजर किसून घ्या.
मग भिजवलेल्या रव्यामध्ये शीजवलेल्या शेवया, चिरलेला कांदा, शिमला मिर्च, गाजर, कोथबिर, चिली फ्लेस्क, मिरे पावडर, बेसन, लिंबुरस, मीठ चवीने घालून चांगले मिक्स करून घ्या.
एका बाऊलमध्ये शेवया घेवून त्याचा चुरा करून घ्या. मग मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. एक गोळा घेवून थोडा चपटा करून शेवयामध्ये घोळून घ्या. अश्या प्रकारे सर्व गोळे शेवयामध्ये घोळून घ्या.
कढईमद्धे तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मध्यम विस्तवावर गोल्डन रंगावर तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व गोळे तळून घेवून टिशू पेपरवर ठेवा.
गरम गरम रवा शेवयाचे कटलेट टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.