फक्त एक ट्रीक वापरुन कायमचे केस गळणे थांबवा
Home Remedy And Simple Tricks To Control Hair Fall
The Marathi language video of this Home Remedy And Simple Tricks To Control Hair Fall can be seen on our YouTube Channel: Home Remedy And Simple Tricks To Control Hair Fall
केस गळणे किंवा तुटणे ह्या समस्यानी सर्वजण परेशान आहेत. आपण झोपयला जातो तेव्हा उशीवर केस दिसतात, विंचरतो तेव्हा फरशीवर पडतात, कंगव्यामध्ये अडकतात किंवा खांद्यावर पडतात त्यामुळे आपण नेहमी केसांच्या समस्यांनी चिंतीत असतो. पण आपण एका चीजनी आपल्या केसांचे आरोग्य चांगले ठेवू शकतो. ते म्हणजे कांदा आश्चर्य वाटले ना. आपण केस गळतात म्हणून महागडी तेल आणतो पण त्या आयवजी हा साधा सोपा कमी खर्चाचा उपाय करून बघा.
आज आपण फक्त एक ट्रीक वापरुन कायमचे केस गळणे थांबवा ते कसे काय ते आपण आता बघू या. वैज्ञानिकांच्या मते कांद्याच्या रसामध्ये डाएट्री सल्फर असून त्यामध्ये अमिनो एसिड प्रोटीन हा एक महत्वपूर्ण घटक आहे. हे प्रोटीन व कैरेटिन हे केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे. तसेच कांद्यामद्धे पोटेशियम, विटामिन C, A व E भरपूर प्रमाणात आहे. कांद्याच्या ह्या गुणामुळे आपले केस गळणे किंवा पातळ होणे किंवा कोंडा डैंड्रफ ह्या पासून बचाव होऊ शकतो. कांद्यामद्धे एंटीऑक्सीडेंट गुण आहेत त्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत व केसांना चकाकी येते.
कांद्याचा रस जूस काढून केसांच्या मुळाशी लावतात त्यामुळे आपले केस मजबूत बनून डाट होतात. पण एक लक्षात ठेवा कांद्याचा जूस लावण्याची एक पद्धत आहे जी आपल्याला काटेकोर पणे पाळली पाहिजे.
कांद्याचे जूस केसांना कसे लावायचे ते स्टेप बाय स्टेप खाली दिले आहे.
स्टेप 1 – एक छोट्या कांद्याची साल काढून त्याचे तुकडे करून घ्या मग मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या.
स्टेप 2 – एक पातळ स्वच्छ कापड घेवून त्यामध्ये कांद्याची पेस्ट घालून गाळून घ्या.
स्टेप 3 – मग गाळलेला जूस आपण जे तेल वापरतो म्हणजे बदाम, को अपने किसी भी तेल में मिक्स करें जैसे बदाम, ऑलिव ऑयल किंवा नारळाचे तेल ह्या मध्ये मिक्स करावे.
स्टेप 4 – तेलामध्ये कांद्याचे जूस चांगले मिक्स केल्यावर मगच केसांच्या मुळाशी लावून चांगले मसाज करावे.
स्टेप 5 – केसांना मसाज केल्यावर एक तास तेल तसेच ठेवावे मग शैम्पूनी केस धुवावे. असे आपण आठवड्यातून दोन वेळा तरी करावे म्हणजे आपल्याला त्याचे फायदे लगेच दिसून येतील.