महाराष्ट्रियन स्टाईल मसाले भात (अगदी लग्नात बनवतात तसा)
Maharashtrian Traditional Masale Bhat
मसाले भात ही महाराष्ट्रियन लोकांची अगदी लोकप्रिय डिश आहे. महाराष्ट्राल लग्न कार्य असले किंवा सणवाराला मसाले भात अगदी आवर्जून बनवतात.
मसाले भात ही वन डिश मिल आहे. मसाले भात अगदी पौस्टीक आहे कारणकी ह्यामध्ये भाज्या आहेत, ओला नारळ आहे त्यामुळे तो पौस्टीक आहेच. मसालेभात सर्वजण अगदी आवडीने खातात. ह्यामध्ये दोन प्रकारचे मसाले वापरले आहेत त्यामुळे त्याची टेस्ट अगदी खमंग लागते.
विडियो मध्ये आपण मसाले भात बघणार आहोत तो अगदी लग्नातील जेवणात जसा बनवतात अगदी तसा बनतो.
The Marathi language video of this Spicy Masale Bhat can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Kokani Style Masale Bhat
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहित्य:
2 वाट्या बासमती तांदूळ
2 वाट्या भाज्या (३-४ मिनिट उकडून घ्या) (गाजर, फ्लॉवर, कोबी, शिमला मिर्च, फ्रेंच बीन्स, बटाटा व हिरवे मटार)
१ छोटे लिंबूरस
मीठ चवीने
मसाला हिरवा वाटून:
1/2 कप कोथंबीर
1 हिरवी मिरच्या
१ टी स्पून बडीशेप
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
लाल मसाला:
१ टे स्पून तेल
2 टे स्पून कांदा
१/2 कप ओला नारळ खोवून
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून धने-जिरे पावडर
१ छोटा टोमाटो (चिरून)
1 टी स्पून गरम मसाला
१५-२० पुदिना पाने
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ छोटा कांदा (चिरून)
७-८ मिरे
२ तमलपत्र
३-४ हिरवे वेलदोडे
१/२ टी स्पून शहाजिरे
१/४ टी स्पून हळद
७-८ काजू
७-८ बदाम
२ टे स्पून किसमिस
कृती: तांदूळ धुवून बाजूला ठेवा. नारळ खाऊन घ्या. भाज्या धुवून चिरून घ्या. कोथबिर धुवून चिरून घ्या. लसूण सोलून घ्या. कांदा चिरून घ्या.
हिरव्या मसालासाठी: कोथबिर, आल, लसूण,हिरवी मिरची व बडीशेप वाटून घ्या.
लाल मसाल्यासाठी: मिक्सरच्या भांड्यात नारळ, लाल मिरची पावडर, धने=जिरे पावडर, गरम मसाला, व थोडे पाणी घालून थोडे जाडसर वाटून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करून वाटलेला मसाला घालून पाच मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये टोमाटो व पुदिना पाने घालून मिक्स करून घ्या.
मसाले भात साठी: प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमलपत्र, मिरे, हिरवे वेलदोडे, दालचीनी, शहाजिरे, व कांदा घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये काजू, बदाम, किसमिस व धुतलेले तांदूळ घालून दोन मिनिट परतून घेऊन त्यामध्ये हिरवा मसाला घालून दोन मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये लाल परतलेला मसाला, उकडलेल्या भाज्या, मीठ, लिंबूरस, तूप घालून चार कप पाणी घाला मिक्स करून कुकरचे झाकण लावून दोन शिट्या काढा.
गरम गरम मसालेभाता वर कोथंबीर व नारळ घालून सजवा व सर्व्ह करा.