परफेक्ट महाराष्ट्रियन बटाटा कांदा पोहे
Perfect Maharashtrian Batata Kanda Poha Or Pohe
कांदा पोहे ही महाराष्ट्रियन लोकांची लोकप्रिय डिश आहे. आपण सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. पण आता सगळी कडे कांदा पोहे ही डिश लोकप्रिय झाली आहे.
बटाटा कांदा पोहे बनवताना आपण बटाटे उकडून सोलून वापरू शकतो. पण अश्या प्रकारचे बटाटा कांदा पोहे वापरताना कच्चा बटाटा करून वापरले आहे त्यामुळे त्याची टेस्ट मस्त लागते.
The Marathi language video of this Tasty Batata Kanda Poha can be seen on our YouTube Channel: Traditional Maharashtrian Batata Kanda Poha
बनवण्याची वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 कप जाडे पोहे
1 मध्यम आकाराचा कांदा
1 छोटा बटाटा
2-3 हिरव्या मिरच्या
1 छोटे लिंबू रस
1 1/2 टी स्पून साखर
मीठ चवीने
1/2 कप कोथबिर (चिरून)
सजावटीसाठी शेव
फोंडणी करिता:
2 1/2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
8-10 कडीपत्ता पाने
1/4 टी स्पून हळद
कृती: प्रथम पोहे चाळणीमध्ये घेवून धुवून घेवून तसेच 5-7 मिनिट बाजूला ठेवा. कांदा उभा पातळ चिरून घ्या. बटाटा सोलून पातळ काप करून धुवून घ्या. हिरव्या मिरच्या व कोथबिर धुवून चिरून घ्या.
पोहे चाळणी मधून काढून एका बाउलमध्ये घ्या. मग त्यामध्ये चवीने मीठ, लिंबूरस, साखर व चिरलेली कोथबिर घालून मिक्स करून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घाला मोहरी तडतडली की जिरे घालून चिरलेला कांदा, कडीपत्ता व हिरव्या मिरच्या घालून 1-2 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये पातळ चिरलेला बटाटा घालून थोडेसे मीठ घालून मिक्स करून 2-3 मिनिट परतून त्यामध्ये हळद घालून मिक्स करून पोहे घाला. पोहे चांगले मिक्स करून घेवून कढईवर झाकण ठेवून 2-3 मिनिट गरम करून चांगली दणदणीत वाफ येवू द्या.
मग विस्तव बंद करून पोहे सरव्हिंग प्लेटमध्ये काढून वरतून कोथबिर व शेव घालून सजवून गरम गरम सर्व्ह करा.