हलवाई सारखा क्रिस्पी स्टफ्ड ब्रेड पकोड़ा
Restaurant Style Crispy Stuffed Bread Pakora
पाकोडा म्हणजेच भजी म्हंटले की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. बाहेर पाऊस पडत असला तर पकोडा बनवून सर्व्ह करायला सुद्धा मस्त वाटते.ह्या अगोदर आपण खेकडा भजी, कांदा भजी, उडीद डाळ भजी बघीतली आता आपण हलवाई सारखा क्रिस्पी स्टफ्ड ब्रेड पकोड़ा बघणार आहोत.
हलवाई सारखा क्रिस्पी स्टफ्ड ब्रेड पकोड़ा बनवताना बटाट्याचे सारण भरून आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत. बटाट्याचे सारण खूप टेस्टी आहे त्यामुळे ब्रेड पाकोड्याला खूप छान टेस्ट येते. आपण ब्रेड पकोडा टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video of this Crispy Tasty Stuffed Bread Pakora can be seen on our YouTube Channel: Crispy Potato Stuffed Bread Pakora
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
4 मोठे ब्रेड स्लाईस
1 कप बेसन
2 टे स्पून तांदळाचे पीठ
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
2 चिमुट बेकिंग सोडा
तेल ब्रेड पकोडा तळण्यासाठी
सारणाकरीता:
2 मोठे बटाटे (उकडून, सोलून, किसून)
1/4 कप कोथबिर (चिरून)
2-3 हिरव्या मिरच्या
4-5 लसूण पाकळ्या
1” आले तुकडा
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1/4 टी स्पून हिग
7-8 कडीपत्ता पाने
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
कृती: सारणासाठी प्रथम बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. मग कोथबिर, आले, लसूण व हिरवी मिरची बारीक वाटून घ्या. मग एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, कडीपत्ता घालून वाटलेला हिरवा मसाला घालून परतून घ्या. हिरवा मसाला परतून झालाकी त्यामध्ये हळद व चवीने मीठ घालून उकडलेला बटाटा घालून मिक्स करून दोन मिनिट परतून घ्या. मग विस्तव बंद करून सारण थंड करायला ठेवा.
आवारणासाठी: एका बाउलमध्ये बेसन घेवून त्यामध्ये दोन टे स्पून तांदळाचे पीठ घालून, लाल मिरची पावडर, हळद, मीठ घालून पाणी घालून भजा सारखे पातळ पीठ भिजवून घ्या.
ब्रेड एका प्लेटमध्ये घेवून एका स्लाईसवर 2 टे स्पून सारण ठेवून पसरवून घ्या. मग त्यावर दुसरी ब्रेड स्लाईस ठेवून थोडी दाबून त्याचे त्रिकोणी आकाराचे चार स्लाईस कापून घ्या. अश्या प्रकारे सर्व बनवून घ्या.
कढईमद्धे तेल गरम करून घ्या. भिजवलेल्या पिठामध्ये 2 चिमुट बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करून घ्या. मग एक त्रिकोणी ब्रेड स्लाईस घेवून बेसनच्या भिजवलेल्या पिठात सर्व बाजूने बुडवून गरम तेलात छान गोल्डन रंगावर तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व ब्रेड पकोडे तळून घ्या.
गरम गरम ब्रेड पकोडे टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.