अगदी निराळे टेस्टी कुरकुरीत चीज समोसे
Tasty Crispy Different Style Cheese Stuffed Samosa
आपण नेहमी समोसे बनवतो. समोसे ही डिश सर्वांना आवडते. समोसे नाश्त्याला किंवा साईड डिश म्हणून सुद्धा बनवता येतात. चीज म्हंटले की मुलांना खूप आवडते व समोसे म्हणजे मुले अगदी खुषच होणार.
समोसे बनवतांना आपण आवरण मैदाच्या पिठाचे बनवतो व सारण बटाटा किंवा अजून काही दुसर्या प्रकारचे सारण बनवतो. पण ह्या विडियो मध्ये आपण आवरण व सारण हे अगदी वेगळ्या प्रकारचे बनवले आहे व ते खूप टेस्टी लागते.
The Marathi language video of this Cheese Stuffed Samosa can be seen on our YouTube Channel: Tasty Crispy Different Style Cheese Stuffed Samosa
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
आवरणासाठी:
2 छोटे बटाटे (उकडून)
1 कप मैदा किंवा बेसन किंवा रवा
1 छोटासा कांदा
1 छोटीशी शिमला मिर्च
1/2 टी स्पून मिरे पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून चिली फ्लेस्क
2 टे स्पून कोथबिर
मीठ चवीने
2 टी स्पून तेल
सारणासाठी:
2 चीज क्युब
तेल समोसे तळण्यासाठी
कृती: प्रथम बटाटे उकडून, सोलून व किसून घ्या. कांदा, शिमला मिर्च व कोथबिर चिरून घ्या.
आवरणासाठी: एका बाउल मध्ये उक्द्लेले बटाटे घेवून त्यामध्ये मैदा किंवा रवा किंवा बेसन घालून, चिरलेला कांदा, कोथबिर, शिमला मिर्च, मिरे पावडर, चिली फ्लेस्क, गरम मसाला व मीठ घालून घट्ट पीठ मळून घ्या.
सारणासाठी: चीज क्युबचे उभे लांबट जाड आकाराचे तुकडे कापून घ्या.
सामोसेकरिता: मळलेल्या पिठाचे दोन भाग करून त्याच्या दोन थोड्या मोठ्या चपाती सारख्या लाटून घ्या. एक चपाती घेवून त्यावर उभे चीज क्युब ठेवून त्यावर दुसरी लातलेली पोळी ठेवून बाजूनी थोडे दाबून घ्या. मग सामोस्याच्या आकाराचे त्रिकोण कापून घ्या.
एका कढईमद्धे तेल गरम करून गोल्डन रंगावर छान कुरकुरीत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व चीज भरलेले समोसे तळून घ्या.
गरम गरम चीज समोसे टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.