स्वादिष्ट हेल्दि पोहा बटाटा कचोरी
Tasty Crispy Healthy Poha Batata Kachori
आपण मैदा व मूग डाळ वापरून हलवाया सारखी कचोरी बनवतो पण पोहे बटाटा वापरुन अगदी हेल्दि कचोरी बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल. तसेच अश्या प्रकारची कचोरी हेल्दि सुद्धा आहे. आपण कांदा पोहे बनवतो तेच पोहे व बटाटे वापरुन अश्या प्रकारची कचोरी बनवली आहे. कचोरी आपण जेवताना किंवा नाश्त्याला किंवा पाहुणे येणार असतील तर आपण अश्या प्रकारची निराळी कचोरी बनवू शकतो.
पोहा बटाटा कचोरी बनवताना शेगदाण्याचे सारण भरले आहे त्यामुळे ह्याची टेस्ट अगदी निराळी लागते.
The Marathi language video of this Poha Batata Kachori can be seen on our YouTube Channel: Healthy Poha Batata Kachori
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
आवरणासाठी:
1 कप पोहे (भिजवून)
1 मोठा बटाटा (उकडून)
4 ब्रेड स्लाईस
2 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून मिरे पावडर
2 टे स्पून कोथबिर
1 टी स्पून लिंबूरस
मीठ चवीने
सारणासाठी:
1 वाटी शेगदाणे (भाजून, सोलून)
1” आले तुकडा
2-3 हिरव्या मिरच्या
1 टी स्पून लाल मिरची पावडर
2 टे स्पून कोथबिर
1 टी स्पून लिंबूरस
मीठ चवीने
तेल कचोरी तळण्यासाठी
कृती: प्रथम बटाटा उकडून, सोलून, किसून घ्या. पोहे धुवून घ्या. कोथबिर धुवून चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यात ब्रेड, हिरवी मिरची व आले घालून ग्राइंड करून घ्या. शेगदाणे भाजून, सोलून घ्या.
आवरणासाठी: एका बाउलमध्ये भिजवलेले पोहे, बटाटे, ग्राइंड केलेले ब्रेड क्र्म्ब, कोथबिर, लिंबूरस व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.
सारणासाठी: मिक्सरच्या भांड्यात शेगदाणे, आले, हिरवी मिरची घालून थोडे जाडसर ग्राइंड करून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ, लिंबुरस व कोथबिर घालून मिक्स करून घ्या.
कचोरीसाठी: पोहयच्या सारणाचे छोटे छोटे एक सारखे गोळे बनवून घ्या. मग त्यामध्ये 1 चमचा सारण भरून गोळा चांगला बंद करा. गोळा बंद करताना हाताला थोडेसे पानी लावले तरी चालेल. सर्व गोळे सारण भरून तयार करून घ्या.
एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये दोन दोन गोळे सोडून गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या.
गरम गरम पोह्याची कचोरी टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.