झटपट सोपी निराळी बर्फी बिना खवा मावा
Zatpat Quick Different Style Without Khoya Barfi
झटपट सोपी अगदी नवीन निराळी बर्फी बिना खवा किंवा मावा फक्त 3 साहीत्य वापरुन बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल
आपण आज एक नवीन प्रकारची बर्फी बनवणार आहोत त्यासाठी आपण खवा किंवा मावा वापरणार नाही. फक्त आपल्या घरातील 3 साहीत्य वापरुन झटपट बर्फी बनवणार आहोत. आपण अश्या प्रकारची बर्फी जेवण झाल्यावर सर्व्ह करू शकतो. किंवा सणवाराला किंवा इतर दिवशी सुद्धा सर्व्ह करू शकतो.
आपण आता पर्यन्त बर्याच वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी कश्या बनवायच्या ते पाहिले आता हा बर्फीचा नवीन प्रकार आहे. अगदी कमी खर्चात घरातील साहित्य वापरुन अशी बर्फी बनवू शकतो.
The Marathi language video of this Without Khoya Barfi can be seen on our YouTube Channel: Zatpat Quick Different Style Without Khoya Barfi
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1 कप साखर (त्या पेक्षा थोडी कमी घेतली तरी चालेल)
1/2 कप मैदा
8-10 काजू
1 टे स्पून तूप
1/2 टी स्पून वेलची पावडर
कृती: कढई गरम करून त्यामध्ये तूप गरम करून घ्या. मग त्यामध्ये काजू गुलाबी रंगावर परतून घेवून बाजूला थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर त्याची बारीक पावडर करून घ्या. एका स्टीलच्या प्लेटला किवा ट्रेला तूप लावून घ्या.
त्याच कढईमध्ये राहिलेल्या तुपात मैदा गुलाबी रंगावर मंद विस्तवावर भाजून घ्या. मैदा भाजताना तो करपता कामा नये. मैदा भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
कढईमद्धे साखर व अर्धा कप पाणी घालून मंद विस्तवावर एक तारी पाक बनवून घ्या. एक तारी पाक झाल्यावर त्यामध्ये भाजलेला मैदा व काजू पावडर घालून मिक्स करून मिश्रण घट्ट होई पर्यन्त मंद विस्तवावर ठेवा. मिश्रण घट्ट व्हायला लागलेकी त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.
मिश्रण घट्ट व्हायला आलेकी लगेच तूप लावलेल्या स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेवून एक सारखे करून घ्या. मिश्रण थोडे कोमट झालेकी त्याच्या वड्या कापून घ्या. वड्या थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.