मनी प्लांट घरात लावल्याने पैसा व सुख समृद्धी मिळते
Amazing Benefits Of Money Plant For Vastu And Finance
मनी म्हणजे पैसा व मनी प्लांट म्हणजे पैशाचे झाड होय ना. मनी प्लांटचा वेल जेव्हडा हिरवा गार असेल तेव्हडया वेगाने पैसा आपल्या घरात येतो. मनीप्लांटच्या वेलची पाने कोमेजलेली किंवा पांढरी होणे अशुभ मानले जाते. मनी प्लांटचा वेल जमिनीवर पसरलेला नसावा तो नेहमी वरच्या दिशेने चढवा म्हणजे आपली प्रगती नेहमी वरचढ होते.
The Marathi language video of this Amazing Benefits Of Money Plant For Vastu And Finance can be seen on our YouTube Channel: Amazing Benefits Of Money Plant For Vastu And Finance
मनी प्लांटचा वेल नेहमी घरात लावावा म्हणजे आपला पैसा नेहमी घरात राहील. आपण घरात पॉम लीव्स, बोनसाई ही शोभेची झाडे ठेवतो. पण अगदी कमी पैशात व चांगले दिसणारे प्लांट म्हणजे मनी प्लांट त्याचा हिरवा रंग आपले मन मोहून टाकतो. असा गुण कोणत्या सुद्धा इंडोर प्लांट मध्ये नाही. बऱ्याच वर्षापासून लोकांचे म्हणणे आहे की मनी प्लांट घरात लावला की घरात पैसा येतो किंवा घरातील लोकांची खूप प्रगती होते.
असे म्हणतात की ज्या घरात मनी प्लांट लावतात तेथे सुख समृद्धीच्या बरोबर पैसा सुद्धा चांगला मिळतो. पण काही जण म्हणतात की आमच्या घरात मनी प्लांट आहे पण आमची प्रगती म्हणावी तेवहडी होत नाही व आर्थिक नुकसान होते ह्याचे कारण म्हणजे मनी प्लांट ठेवण्याची चुकीची जागा किंवा चुकीची दिशा आहे,
वास्तु शास्त्र नुसार प्रतेक झाडासाठी विशिष्ट जागा ठरवलेली आहे. जर आपण योग्य ते झाड योग्यत्या दिशेला बरोबर लावले कीव ठेवले तर सकारात्मक फळ मिळतात. जर आपण योग्य त्या दिशेला झाड लावले नाहीतर त्याचा नकारात्मक प्रभाव होतो. त्यामुळे फायदा होण्याच्या आयवजी नुकसान होते.
वास्तु शास्त्र नुसार आपण मनी प्लांट योग्य त्या दिशेला किंवा योग्य त्या ठिकाणी नाही लावला तर फायद्याच्या आयवजी नुकसान सोसावे लागते. वास्तु शास्त्र नुसार मनी प्लांट लावण्याची दिशा म्हणजे आग्नेय दिशा अगदी योग्य आहे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण होते.
मनी प्लांट ला आग्नेय म्हणजेच दक्षिण-पूर्व दिशाला लावण्याचे कारण की ह्या दिशाचे देवता श्री गणेशजी असून प्रतिनिधि शुक्र हैं। श्री गणेश जी अमंगल चा नाश करणारे आहेत तर शुक्र सुख-समृद्धि देणारे आहेत. म्हणूनच मनी प्लांट ला आग्नेय दिशा ला लावणे फायदेशिर आहे.
मनी प्लांट ला कधी सुद्धा इशान्य म्हणजेच उत्तर पूर्व दिशा ला लावू नये. कारण ही दिशा अगदी नकारात्मक आहे. ईशान्य दिशेचा चे प्रतिनिधि देवगुरू बृहस्पति मानले जातात. व शुक्र व बृहस्पति ह्यांच्यामध्ये शत्रुता आहे. म्हणूनच शुक्र च्या संबंधितले झाड ईशान्य दिशाला असणे नुकसान कारक आहे. तसेच ह्या दिशेला तुळशीचे झाड लावले जाते.
मनी प्लांट घरात लावल्याने जसे घराची सुंदरता वाढते तसेच पति-पत्नी मधील संबंध चांगले राहतात. मनी प्लांटची एक खासीयत आहे की आपल्या घरात किंवा घरा बाहेर मनी प्लांट अगदी सहज पणे येते. मनी प्लांट घरात पाण्यात सुद्धा लावता येते व त्यासाठी काही जास्त मेहनत सुद्धा करावी लागत नाही. ते आपण दोन्ही जागी लावू शकतो.
मनी प्लांटची पाने जर पांढरी किंवा पिवळी झाली तर लगेच काढावी पण पाने काढताना हातांनी ओढून काढू नये त्यासाठी कात्रीचा वापर करावा व त्यानी पान कापून काढावी.
अजून एक महत्वाची टीप म्हणजे मनी प्लांट कधी सुद्धा नर्सरीतून विकत आणू नये शक्यतो कोणी भेट म्हणून दिलेला असावा किंवा सुख समृद्धी व पैसा असणाऱ्या घरातून आपण त्यांच्या नकळत थोडासा कापून आपल्या घरी आणून लावावा.