तुळस औषधी गुणधर्म
Amazing Health Benefits Of Tulsi Plant (Holy Basil Leaves)
प्रतेक हिंदू घराच्या समोर तुळस लावतात. व हिंदू लोक तुळशीला पवित्र मानतात. तुळस ही एक अतिशय उपयोगी औषधी वनस्पती आहे. तिचे फक्त धार्मिक दृष्ट्या महत्व आहे तसेच ती खूप औषधी म्हणून ही तिचे स्थान अद्वितीय आहे. तुळशीच्या समोर सकाळी सडा घालून रांगोळी काढवी पण पाणी घालावे. तसेच रोज संध्याकाळी तुळशी समोर दिवा व आगरबती लावावी त्यामुळे आपल्या घरावर तुळशी आईची कृपा राहून घरात सुख समृद्धी राहते.
The Marathi language video of this Amazing Health Benefits Of Tulsi Plant (Holy Basil Leaves) can be seen on our YouTube Channel: Amazing Health Benefits Of Tulsi Plant (Holy Basil Leaves)
तुळशीचे आयुर्वेदात तसेच होमिओपथिमध्ये वेगवगळ्या दृष्टीने महत्व आहे. काळी व पांढरी तुळसअसे दोन प्रकार आहेत. कृष्ण तुळशीची पान काळसर असतात तर पांढऱ्या तुळशीची पान हिरवी असतात.
तुळस ही स्वादात तिखट, काही अंशी कडवट, पचायला हलकी, गरम, कोरडी,, कफ व वायु यांचा नाश करणारी, रुची व पचनक्रिया वाढणारी, सुगंधी, सात्विक तसेच दुर्गंधी नाश करणारी आहे. आपल्या घराच्या दारा समोर तुळस लावणे हे धर्म व आरोग्य रक्षण यांचे एक अनिवार्य अंग आहे.
तुळशीच्या सेवनाने अरुची, फुफुसातील कफ, व ढास लागणे हे सर्व विकार नष्ट होतात. खोकला व उलटी ह्यावर तुळस खूप परिणाम कारक आहे. अर्धशिशी, विष, डोकेदुखी, कॉलरा, तोंडाला वायस येणे, छातीत दुखणे, ह्या वर सुद्धा तुळस गुणकारी आहे.
सर्दीवर उपाय म्हणून तुळशीच्या रसात मध्य घालून घेतल्यास चांगला उपयोग होतो. खोकल्यावर उपाय म्हणून कृष्ण तुळशीच्या रसात मध्य घालून तो रस घ्यावा.
कानातून पू किंवा घाण येत असेल तर तुळशीच्या रसाचे थेंब घालावे.
फ्लू सारख्या तापात ½ ग्राम त्रिभुवनकीर्ती व दोन चमचे तुळशीचा रस व आल्याचा रस एकत्र करून घेतल्यास नक्कीच उपयोग होतो.
दमा उसळल्यास तुळशीच्या पाच ग्राम मंजिरा व त्याच्या दुपट्ट सुंठ घ्यावी व त्याचा काढा करून तो थंड झाल्यावर त्यात मध घालून 2-3 वेळा घ्यावा.
तोंडाला घाण वास येत असेल तर तुळशीची 20-25 पान रोज चावून खावीत.
तुळशी बरोबर दूध कधी घेवू नये. तुळस कृमीनाशक व रोग प्रतीकर शक्ति वाढवणारी असल्याने कॅन्सर सारख्या रोगातही उपयुक्त ठरू शकेल अशी शक्ति तिच्यात आहे.
तुळशीच्या रसाच्या सेवनाने त्वचा रोग म्हणजेच गजकर्ण अथवा कोड बरे होण्यास मदत होते.
तुळशीचा रस डेगू व मलेरियाच्या तापावर गुणकारी आहे.
तुळशीमद्धे इगेनॉल हे द्रव्य आहे त्यामुळे मधुमेही रुग्णासाठी फायदेशिर आहे.
तुळशीचा रसाचे रोज सकाळी सेवन केल्याने स्मरणशक्ति वाढते.
डोक दुखत असेलतर तुळशीचा रस व चंदन पावडर मिक्स करून डोक्यावर लावावे लगेच आराम मिळेल.
किडनी स्टोन असणाऱ्यानी रोज तुळशीचा रस व मध्य मिक्स करून सेवन करावे.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रोज सकाळी 10-12 तुळशीची पाने चावून खावी त्यामुळे मानसिक तनाव कमी होईल.
किकट किंवा गांधीनमाशी चावणे त्यावर तुळशीची माती लावावी. म्हणजे लगेच आराम मिळेल.
कृष्ण तुळशीच्या पानाच्या रासचे थेंब डोळ्यात घातल्यास डोळ्याचे दुखणे कमी होते.
अशी ही गुणकारी तुळस आहे.