गणेश चतुर्थी 2020 ह्या शुभ अवसरवर विघ्नहर्ता श्री गणेशजींची पुजा करून मनासारख वरदान मिळेल
Ganesh Chaturthi 2020 Shree Ganesh Pujan Manokamna Purti
भाद्रपद शुक्ल पक्ष ह्या दिवशी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2020) हा सण साजरा करायचा आहे. ह्या वर्षी गणेश चतुर्थी 22 ऑगस्ट ह्या दिवशी आहे. आपल्या हिंदू धर्मात श्री गणेश ह्याची पूजा करण्यात विशेष महत्व आहे. भगवान गणेश ह्यांना गजानन किंवा विघ्नहर्ता ह्या नावांनी संबोधले जाते. गजानन ह्यांना रिद्धि-सिद्धि व सुख-समृद्धिचा प्रदाता मानले जाते (प्र्दाता म्हणजे मोठा दानी, सुख समृद्धि देणारा) शास्त्रानुसार श्री गणेशजी हे कट, कष्ट, दरिद्रता व रोगापासून मुक्ति देतात.
प्राचीन काळा पासून असे म्हणतात की श्री गणेशजींची विधी पूर्वक पुजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
The Marathi language video of this Ganesh Chaturthi 2020 Shree Ganesh Pujan can be seen on our YouTube Channel: Ganesh Chaturthi 22 Augut 2020 Shree Ganesh Pujan
गणेश चतुर्थी 2020: शुभ मुहूर्त
गणेश पूजन करण्यासाठी मुहूर्त- सकाळी 11:06 पासून 1: 39 मिनट पर्यन्त
अवधि : 2 तास 33 मिनट
चंद्र दर्शन वर्ज: सकाळी 9 वाजून 7 मिनिट ते रात्री 9 वाजून 25 मिनिट
हे सुद्धा वाचा: संतती सुख व दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी श्री गणेशजींचे हे व्रत करा.
गणेश चतुर्थी पूजन विधि-
प्रथम सकाळी लवकर उठून आपले नित्य कर्म करून स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा.
मग तांब्याची, सोन्याची, चांदीची किंवा मातीची श्री गणेशजिची प्रतिमाची स्थापना करा.
मग भगवान गणेश यांना वस्त्र अर्पित करा.
भगवान गजानन ह्यांना सिंदूर अर्पित करा. हळद कुंकु अर्पित केल्यावर अक्षता व फुले अर्पित करा. श्री गणेशजींना लाल रंगाची फूल सर्वात जास्त आवडतात.
गणेश जी ह्यांना 21 दूर्वाची जुडी अर्पित करून मग त्यांना 21 लड्डूचा किंवा नारळाच्या मोदकाचा भोग म्हणजेच नेवेद्य दाखवा.
5 लाडू किंवा मोदक भगवान गणेश ह्यांना अर्पित करून बाकीचे लाडू गरीबान मध्ये वाटा.
मग भगवान गणेश ह्यांची विधि संपन्न पुजा करा. गणेश चतुर्थी ह्या दिवशी गणेश चतुर्थी कथा व गणेश चालीसा वाचणे उत्तम मानले जाते.
गणेश स्तोत्रचे वाचन करून श्री गणेश ह्याची आरती म्हणावी.
संध्याकाळी उपवास सोडावा.
आपण कोणत्यापण देवांची पुजा करण्या अगोदर श्री गणेशजींची पुजा प्रथम करतो. तसेच कोणते सुद्धा कार्य करण्या अगोदर श्री गणेशजींची पुजा अर्चा केली जाते. त्याशिवाय कोणतेसुद्धा मंगल कार्य पूर्ण होत नाही.
गणेशजींची पुजा अती प्राचीन काळा पासून केली जाते. भगवान शंकर, विष्णु, दुर्गा माता, सूर्यदेव, ह्यांच्या बरोबरच पाच मुख्य देवांच्या बरोबर श्री गणेशजी ह्याचा समावेश आहे.
गण ह्याचा अर्थ वर्ग, समूह किवा समुदाय व ईशचा अर्थ स्वामी होतो. शिव गण किंवा देवगण ह्याचे स्वामी म्हणजे गणेश होय.
श्री गणेशजीची 12 नाव आहेत. समुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लबोदर, विकट, विघ्नविंनाशन, विनायक, धूम्रकेतू, गणध्यक्ष, भालचंद्र, गजानन.
पौराणिक ग्रंथा नुसार ॐ ह्या शब्दाला साक्षात श्री गणेशजींचे स्वरूप मानतात. जसे प्रतेक शुभ कार्यच्या अगोदर गणेश पूजन करतात तसेच प्रतेक मंत्राच्या अगोदर ॐ ह्या लावतात म्हणजे मंत्र अगदी प्रभावी होतो.