जेष्ठ गौरी पूजन माहिती मुहूर्त पुजा साहीत्य आरती
Gauri Puja Muhurat, Sahitya, Bhog And Aarti
श्रावण महिना संपला की भाद्रपद महिना चालू होतो की लगेच सर्वत्र गणपतीची धामधून चालू होते. गणपती बाप्पांची स्थापना करून लगेच जेष्ठ गौरीच्या आगमनाची तयारी चालू होते. महाराष्ट्रात जेष्ठ गौरी पूजन खूप मनोभावे करतात.
भाद्रपदात अनुराधा नक्षत्रावर सोन्याच्या पावलांनी जेष्ठगौरीचे आगमन होते. तेव्हा घरोघरी उत्साही वातावरण असतं. दृढ श्रद्धा व उत्कट भक्तीने गौरीचे पूजन होते. महाराष्ट्रातील स्त्रिया सौभाग्य संवर्धनाच्या हेतूने हा सण मोठ्या आवडीने करतात. देवी पार्वती ही या गौरीच्या रूपाने माहेरी येते अशी समजूत आहे. गौरी ही स्त्रीची जीवाभावाची सखी आहे. काही जणी नदीकाठावरून आणलेले दोन खडे तर काही जणी तेरड्याची रोपे अशी प्रतीकात्मक गौर बसवितात तर काही जणी मुखवटे असलेली, भरजरी शालू नेसलेली, दागीन्यांनी नटलेली, साजरी गौर बसवताना दिसतात. जशी आपल्या घ्ररात प्रथा आहे तशी गौर बसवून पूजा करतात.
जेष्ठ गौरी पूजन कसे करावे मुहूर्त
पूजेची सामग्री, पूजेचे साहित्य, फुले, पत्री, अलंकार, पूजा, नेवेद्य व आरती
The Marathi language video of this Gauri Puja Muhurat, Sahitya, Bhog And Aarti can be seen on our YouTube Channel: Gauri Puja Muhurat, Sahitya, Bhog And Aarti
आजकालच्या धकाधकीच्या दिवसात घरसंसार, नोकरी, आपले करीयर सांभाळून तारेवरची कसरत करून अगदी आवडीने व तितक्याच श्र्धेनी गौरी पूजन करून आपल्या घराला यश, संपती, संतती व कीर्ती मिळावी म्हणून वर मागतात.
जेष्ठ गौरी पूजन म्हणजे स्त्रीयांचा अगदी आवडता सण आहे. त्यासाठी काय-काय सामग्री व साहित्य लागते त्याची आगोदरच तयारी करून ठेवावी.
जेष्ठ गौरी पूजन कसे करावे मुहूर्त
25 ऑगस्ट मंगळवार जेष्ठ गौरी आगमन दुपारी: 1 :58 मिनिटा नंतर
26 ऑगस्ट बुधवार जेष्ठ गौरी पूजन
27 ऑगस्ट गुरुवार जेष्ठ गौरी विसर्जन दुपारी: 12 :36 मिनिटा नंतर
पूजेची सामग्री : सर्व उपकरणे तांब्याची किंवा चांदीची वापरावीत, ह्यामध्ये ताम्हण, पळी-पात्र, तांब्या, पूजेचे ताट, समई, निरंजन, अगरबत्तीचे घर, घंटा, धूपपात्र, कपूरपात्र इ.
पूजेचे साहित्य : हळद-कुंकू, गंध, अक्षता, गुलाल, सुपाऱ्या, नारळ, विड्याची पाने, गुळ-खोबरे, बदाम, खारका, तांदूळ, गहू, पंचामृत, दुध, दही, तूप, मध. साखर, ५ प्रकारची फळे, सुगंधी तेल, नाणी
फुले : फुलांचा हार, सुटी फुले, कमळ, केवडा, जाई, जुई, शेवंती
पत्री : आघाडा, बेल, दुर्वा, चाफा, डाळीब, धोत्रा, तुळस
अलंकार : बांगड्या, मणीमंगळसूत्र, साडी, हिरवी चोळी, खण व काही दागिने
गौरीच्या पूजेची तयारी अगोदरच करावी म्हणजे आईन वेळेस पंचाईत होणार नाही. गौरी आणण्या पूवी घरातील प्रतेक कोपऱ्यात हळद किंवा रांगोळीने पावलांचे ठसे काढावेत. म्हणजे गौर घरात आली आहे असे म्हणतात. घरामध्ये गौरी बसवतांना भोवती आरस करतात. देवी पुढे फराळाचे जीन्नस ताट भरून ठेवतात. कुंची घातलेली बाळ बसवतात. पंचारतीने, उद्बतीने, अत्तर, गुलाबाने, हळद-कुंकुवाने, अ चंदनाच्या उटीने देवीची पूजा करतात. त्या दिवशी शेपूची भाजी/मेथीची भाजी, खीर, वडे, अनारसे, लाडू व भाकरीचा नेवैद्य दाखवतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी मनोभावे पूजा करून नेवेद्यासाठी चटणी, कोशीबीर, पुरणपोळी, काटाची आमटी, भजी, अळूच्या वड्या, भात करतात. त्यादिवशी संध्याकाळी इतर स्त्रीयांना हळद-कुंकू साठी बोलवतात व रात्री गौर जागवतात. वेगवेगळे खेळ खेळले जातात गौरीची गाणी म्हटली जातात.
तिसऱ्या दिवशी गौरीच्या ओटीसाठी तांदूळ, खारीक, खोबरे, लेकुरवाळे, हळद-कुंकू, पानसुपारी घेतात. खारीक खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे पिवळ्या दोऱ्यात सात ठिकाणी गाठ्वून गळ्यात बांधतात. त्यादिवशी घावन घटले, दही-भात, गव्हल्याची खीर बनवून नेवेद्या दाखवतात.
🌹 *आरती ( गौरी ) महालक्ष्मीची* 🌹
भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा
अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा
गणेशा सहित गौरी धनिष्ठा
बैसली येउनि सकळिया निष्ठा II१||
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
ज्येष्ठा नक्षत्र पुजेचा महिमा
षडरस पक्वान्ने होती सुखधामा
सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा
तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
उत्थापन मूळावर होता अगजाई
वर देती झाली देवी विप्राचे गृही
रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी
वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।