गुळाची स्टफ दशमी गुळाची पोळी तुळगुळ पोळी मुलांच्या नाश्त्यासाठी
Maharashtrian Style Gulachi Stuffed Dashami
गुळाची दशमी ही महाराष्ट्रियन लोकांची लोकप्रिय डिश आहे. तसेच ती पौस्टीक व खमंग सुद्धा आहे. मुले दशमी अगदी आवडीने खातात त्यांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. गुळाची स्टफ दशमी बनयायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे.
गुळाची स्टफ दशमी बनवताना गव्हाचे पीठ, गूळ, डेसिकेटेड कोकनट, तीळ, खसखस वापरली आहे. आपण कुठे ट्रीपला जातांना बरोबर घेवून जावू शकतो.
The Marathi language video of this Maharashtrian Style Gulachi Dashami Gulachi Poli Tilgul Poli Sweet Puri can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Style Gulachi Dashami Gulachi Poli Tilgul Poli Sweet Puri
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 8-10 बनतात
साहीत्य: आवरणासाठी:
2 वाट्या गव्हाचे पीठ
मीठ चवीने
1 टी स्पून तूप
सारणासाठी:
3/4 वाटी गूळ (किसून)
2 टे स्पून तीळ1/2 टी स्पून खसखस
1 टी स्पून डेसिकेटेड
1/2 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ पावडर
साजूक तूप दशमी भाजण्यासाठी
कृती: आवरणासाठी: एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ व मीठ मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये जरूरी प्रमाणे पाणी मिक्स करून घट्ट पीठ मळून घेवून 15 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
सारणासाठी: गूळ किसून घ्या. एका बाउलमध्ये गूळ, तीळ, खसखस, तीळ, डेसिकेटेड कोकनट, वेलची पावडर, जायफळ पावडर घालून मिक्स करून घ्या.
दशमीसाठी: मळलेल्या पिठाचे एक सारखे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. एक गोळा घेवून पुरी सारखा लाटून घ्या. मग त्यामध्ये 1 टे स्पून सारण भरून पुरी बंद करून पुरी सारखी लाटून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर स्टफ दशमी दोन्ही बाजूनी साजूक तुपावर भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व दशम्या भाजून घ्या.
गरम गरम गुळाची स्टफ दशमी गुळाची पोळी तुळगुळ पोळी सर्व्ह करा.