भाद्रपद शुक्ल तृतीया हरतालिकाव्रत माहिती पुजा व आरती
Hartalika Puja, Mahiti Aarti In Marathi
भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिकाव्रत करतात.
Gauri – Hartalika Pujan गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आगोदर हरतालिकाची पूजा स्त्रिया मनोभावे करतात. ही पूजा सकाळी केली जाते. ही पूजा लग्न न झालेल्या मुली चांगला पती मिळावा म्हणून अगदी श्रद्धेनी करतात. दिवसभर उपवास करून दुसर्या दिवशी उपवास सोडतात.
The Marathi language video of this Hartalika, Puja, Mahiti Aarti can be seen on our YouTube Channel: Hartalika Vrat For Unmarried Girls Puja And Aarti In Marathi
श्रावण महिना संपला की सर्वाना गणपतीचे वेध लागतात. भाद्रपद महिन्यातील गणपती गौरीची पूजा ही घरोघरी केली जाते. गणपती हे आपले आराध्य देवत आहे. महाराष्ट्रात तर गणपतीचा सण हा खूप धामघुमीत साजरा करतात. सर्वत्र आनंदी आनंद असतो. सगळीकडे मंगलमय वातावरण असते. अगदी लहान मुलांन पासून आजी-आजोबा सर्व जण आनंदाने सगळ्यात भाग घेत असतात. सगळीकडे एक प्रकारची नव चैतन्याची लहर येते.
महाराष्ट्रात तर गणपती उत्सव अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण कालांतराने त्याचे स्वरूप बदलत चालले आहे. ह्या सणामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येवून हा सण साजरा करतात. गणपती पुढे आरस करून रोज वेगवेगळे करमणुकीचे कारक्रम केले जातात.
गणपती म्हणजे शंकर पार्वतीचे सुपुत्र. गणपती बाप्पा म्हणजे आपली सर्व संकटे दूर करणारा व बुध्दी देणारा आहे.
आपल्याला जेथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग ठेवावा त्याच्या भोवती रांगोळी काढावी. मग चौरंगावर सखी-पार्वतीच्या मूर्ती व गणपतीची देव्हाऱ्यातील मूर्ती किंवा गणपती म्हणून सुपारी ठेवून, हळद-कुंकू लावावे, आघाडा, दुर्वा व फुले व्हावीत, पाच फळे ठेवावीत, तुपाचा दिवा, धूप लावून गणपतीची व हरतालिकेची आरती म्हणावी. संपूर्ण दिवस उपवास करून फक्त फळे, दुध, रताळी खावीत व दुसऱ्या दिवशी उपवास सोडवा. ह्या दिवशी रात्री मुली रात्री मुली व स्त्रिया जागरण करतात व देवाची गाणी व झिमा-फुगडी खेळून मनोभावे पूजा करतात. मग दुसर्या दिवशी प्र्तीमा विसर्जित करावी.
हरतालिकेची आरती
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके।
आरती ओवाळीतें। ज्ञानदीपकळिके।। धृ.।।
हरअर्धांगी वससी। जासी यज्ञा माहेरासी।
तेथें अपमान पावसी। यज्ञकुंडींत गुप्त होसी। जय. ।।1।।
रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी।
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ।।जय. ।।2।।
तापपंचाग्निसाधनें। धूम्रपानें अधोवदनें।केली बहु उपोषणें।
शंभु भ्रताराकारणें। ।।जय.।।3।।
लीला दाखविसी दृष्टी। हें व्रत करिसी लोकांसाठी।
पुन्हां वरिसी धूर्जटी। मज रक्षावें संकटीं।। जय.।। 4।।
काय वर्ण तव गुण। अल्पमति नारायण।
मातें दाखवीं चरण। चुकवावें जन्म मरण। जय. देवी।।5।।