हेल्दि केळ्याचे शिकरण मुलांसाठी
Healthy Kelyache Shikran Banana Shikran For Kids
केळी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत. मुले जर केळी खायचा कंटाळा करत असतील तर केळ्याचे शिकरण बनवून चपाती बरोबर सर्व्ह करा व बघा दोन मिनिटात मुले चपाती संपवतील. किंवा नुसते सर्व्ह केले तरी मस्त लागते.
केळ्याचे शिकरण बनवायला अगदी सोपे व दोन मिनिटात बनवू शकतो. मुलांना भूक लागली तर लगेच अश्या प्रकारचे केळ्याचे शिकरण बनवा.
The Marathi language video of this Healthy Kelyache Shikran Banana Shikran For Kids be seen on our YouTube Channel: Healthy Kelyache Shikran Banana Shikran For Kids
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 मोठ्या आकाराची केळी
2 कप दूध
3 टी स्पून साखर
1/4 टी स्पून वेलची पावडर किंवा वनीला एसेन्स
कृती: प्रथम दूध गरम करून गार करून घ्या. मग त्यामध्ये साखर, वेलची पावडर किंवा वनीला एसेन्स घालून चांगले मिस्क करून घ्या.
केळ्याची साल काढून बारीक चिरून घ्या, मग चिरलेले केळे दुधामध्ये घालून मिक्स करून चपाती बरोबर सर्व्ह करा.
टीप: जर केळ्याचे शिकरण लगेच सर्व्ह करणार नसाल तर फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे केळे काळे पडणार नाही.