केसांमधील डैंड्रफ कोंडा जाण्यासाठी सोपे घरगुती उपाय
Home Remedies How To Remove Dandruff In Marathi
The Marathi language video of this Home Remedies How To Remove Dandruff can be seen on our YouTube Channel: Home Remedies How To Remove Dandruff
डैंड्रफ म्हणजेच केसांमधील कोंडा होणे. केसांमध्ये कोंडा झालकी आपले केस गळायला लागतात. केसांमधील डैंड्रफ हे अगदी कॉमन झाले आहे. डैंड्रफ आपल्या त्वचा व केसांमधील छिद्र ह्याला नुकसान करते. त्यामुळे आपले केस पातळ होऊ शकतात व नवीन केस येणे बंद होते.
डैंड्रफ मुळे आपल्या डोक्या वरील त्वचा कोरडी होऊन सारखी खाज येते. डैंड्रफ होण्याची बरीच कारण आहेत. कोरडी त्वचा, आहार, टेंशन, शैम्पू व आपण आपल्या केसांची कशी निगा घेतो व बाजारातील केसांसाठी क्रीम अथवा तेल वापरतो. त्यामुळे सुद्धा डोक्यात सारखी खाज येते.
डैंड्रफ पासून आपल्या केसांना कसे वाचवावे.
डैंड्रफ पासून बरेच जण परेशान असतात. कारणकी एकदा डैंड्रफ गेला तरी परत डैंड्रफ डोक्यात होतो.
डैंड्रफ जर शैम्पू अथवा काही घरगुती उपचार करून सुद्धा जात नसेल तर डॉक्टरचा सल्ला घेणे योग्य आहे.
जेव्हा आपले केस अगदी खूप गळत असतील तर दुसरे सुद्धा कारण असू शकते.
आपल्या केसांचे आरोग्य चांगले ठेवून नियमित शैम्पू करत जा,
अमेरिकन अकादमी ऑफ डर्मेटालॉजी च्या मते एशिया खंडातील लोकानी रोज केस धुतले पाहिजे.
डैंड्रफ शैम्पू च्या वरती शैम्पू वापरन्याची पद्धत पहावी मगच वापरावा.
केसांना जोरात विंचरणे किंवा हेयर ब्रश टाळावा.
हेयर ड्रायर चा वापर कमीत कमी करावा.
केसांमध्ये डैंड्रफ ची सुरवात झालिकी लगेच विलाज सुरू करा. नाहीतर लगेच डॉक्टरना दाखवा.
केसांमधील कोंडा म्हणजेच डैंड्रफ वरती घरगुती उपाय
• डैंड्रफला अगदी मुळा पासून काढायचे असेल तर कडीलिंबाचा पॅक लावा.
• 4-5 लिंबाची साल 4-5 ग्लास पाण्यात 15 मिनिट उकळून घ्या. मग पानी थंड झाल्यावर त्या पाण्यानी आपले केस धुवा. हा प्रयोग आठोडयात एकदा तरी करा.
• 2 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. मग सकाळी चांगले बारीक वाटून आपल्या केसांना व डोक्याला लावून 30 मिनिट तसेच ठेवा. 30 मिनिट झालेकी केस व डोके स्वच्छ धुवा. हा प्रयोग चार आठवडे करा म्हणजे त्याचे परिणाम चांगले दिसतील.
• लिंबाचा रस काढून अंघोळीच्या अगोदर आपल्या डोक्याला लाऊन थोडे मालीश करून 15 मिनिट तसेच ठेवा. मग डोके स्वच्छ धुवा. त्यामुळे केसांचा चिकटपणा दूर होईल. डैंड्रफ होणार नाही तसेच केस चमक दार दिसतील.
• एलो वेरा जेल केस धुण्याच्या अगोदर 20 मिनिट लावा मग शैम्पू धुवा.
• 1 चमचा लिंबुरस व 5 चमचे नारळाचे तेल मिक्स करून केसाच्या मुळाशी लावा मग 20 मिनिट तसेच राहू द्या. नंतर शैम्पू ने केस धुवा.
• केस धुताना एक चिमूट बेकिंग सोडा शैम्पू मध्ये मिक्स करून केसाना लावा 15 मिनिट तसेच ठेवून मग धुवा.