इन्स्टंट रवा वेज हांडवो
Instant Suji Veg Handvo Recipe
हांडवो ही एक गुजराती डिश आहे पण ती सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. इन्स्टंट रवा वेज हांडवो झटपट बनवता येते. तसेच हे पौस्टीक सुद्धा आहे. आपण नाश्तासाठी बनवू शकतो.
इन्स्टंट रवा वेज हांडवो बनवताना रवा, बेसन, शिमला मिरची, कोबी, गाजर व दही वापरले आहे. तसेच अश्या प्रकारचे इन्स्टंट रवा वेज हांडवो पॅनमध्ये बेक केले आहे. इन्स्टंट रवा वेज हांडवो आपण टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video of this Instant Suji Veg Handvo can be seen on our YouTube Channel: Instant Suji Veg Handvo
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहीत्य:
¾ कप रवा
2 टे स्पून बेसन
3 टे स्पून दही
½ कप भात (शिजलेला)
2 हिरव्या मिरच्या
¼ टी स्पून हळद
½ टी स्पून लाल मिरची पावडर
2 टे स्पून शिमला मिरची (बारीक चिरून)
2 टे स्पून गाजर (बारीक चिरून)
2 टे स्पून कोबी (बारीक चिरून)
1 टी स्पून आल (किसून)
मीठ चवीने
2 टे स्पून तेल
¾ टी स्पून बेकिंग पावडर
फोडणी करीता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1 टे स्पून तीळ
8-10 कडीपत्ता पाने
कृती: प्रथम एक बाउलमध्ये रवा, दही व ¼ कप पाणी मिक्स करून 10-15 मिनिट झाकून बाजूला ठेवा. शिमला मिरची, कोबी, गाजर बारीक चिरून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात शिजवलेला भात व हिरवी मिरची वाटून घ्या. मग भिजवलेल्या रव्यामद्धे वाटलेला भात, गाजर, शिमला मिरची, गाजर, मीठ, आले, हळद, लाल मिरची पावडर, तेल घालून 2-3 टे स्पून पाणी घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये बेकिंग पावडर घालून मिक्स करून घ्या.
एका नॉनस्टिक पॅनमध्ये 2 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, तीळ व कडीपत्ता घालून मग त्यामध्ये हळू हळू रव्याचे मिश्रण घालून एक सारखे करून घ्या. मग त्यावर झाकण ठेवून 10 मिनिट बेक करून घ्या. 10 मिनिट झाल्यावर झाकण काढून हांडवो एका प्लेट मध्ये काढून घ्या. मग परत पॅनमध्ये 1 टे स्पून तेल घालून परत हांडवो दुसऱ्या बाजूनी 4-5 मिनिट झाकण ठेवून बेक करून घ्या.
पॅन मधून इन्स्टंट रवा वेज हांडवो प्लेटमध्ये काढून घ्या व टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.