गणपती बाप्पाच्या खिरापतीसाठी खजुर मोदक
Khajur Modak For Ganesh Chaturthi
गणपती बापांच्या आरतीच्या नंतर प्रसाद म्हणून अश्या प्रकारचे मोदक मस्त आहेत. खजुराचे मोदक हे बनवायला सोपे आहेत. आपण इतर वेळी सुद्धा अश्या प्रकारचे मोदक किंवा लाडू बनवू शकतो.
खजूराचे मोदक बनवताना खजूर, डेसीकेटेड कोकनट, खसखस, काजू बदाम व वेलची पावडर वापरली आहे.
The Marathi language video of this Khajur Modak For Ganesh Chaturthi can be seen on our YouTube Channel: Khajur Modak For Ganesh Chaturthi
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 15 मोदक बनतात
साहीत्य:
20 खजूर (बिया काढून चिरून)
1 टे स्पून खसखस
4 टे स्पून डेसीकेटेड कोकनट
10 बदाम
2 टे स्पून काजू
1 टे स्पून तूप
कृती: प्रथम खजूर चांगले धुवून पुसून घ्या. मग त्याच्या बिया काढून चिरून घ्या. काजू व बदाम जाडसर कुटून घ्या.
एक कढईमद्धे डेसीकेटेड कोकनट थोडे भाजून घेऊन बाजूला ठेवा. खसखस भाजून घ्या व बाजूला ठेवा. त्याच कढईमद्धे तूप गरम करून त्यामध्ये खजूर गरम करून घ्या. खजूर गरम झालकी थोडा मऊ होईल मग त्यामध्ये भाजलेली खसखस, डेसीकेटेड कोकनट व काजू बदाम घालून चांगले एकजीव करून घेऊन त्याचे छोटे छोटे मोदक करून घ्या.
सर्व मोदक तयार झालेकी गणपती बाप्पाना नेवेद्य दाखवून खिरापत म्हणून दाखवू शकता.