कृष्ण जन्माष्टमी भोग बिना मावा किंवा खवा पेढे कसे बनवायचे
Krishna Janmashtami Bhog Without Mawa Kesar Peda Pedha
कृष्ण जन्माष्टमीला बाल कृष्ण यांना पेढ्याचा भोग दाखवून प्रसन्न करा. आज आपण पेढे बनविणार आहोत पण विदाउट मावा किंवा खवा. आपल्याला माहीत आहेच मथुराचे पेढे जग प्रसीद्ध आहेत. पण आपण हे पेढे अगदी वेगळ्या प्रकारे 10 मिनिटात झटपट बनवणार आहोत.
कृष्ण जन्माष्टमीला बाल कृष्ण यांना पेढे नेवेद्य म्हणून दाखवणार आहोत त्यासाठी फक्त दूध, डेसिकेटेड कोकनट, मिल्क पावडर, साखर व ड्राय फ्रूट वापरले आहेत व केसर सुद्धा वापरले आहे. अश्या प्रकारचे केसर पेढे अगदी बनवायला सोपे आहेत.
The Marathi language video of this Krishna Janmashtami Bhog Without Mawa Kesar Peda Recipe can be seen on our YouTube Channel: Krishna Janmashtami Bhog Without Mawa Kesar Peda
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 16 बनतात
साहीत्य:
1 कप दूध
1 कप डेसिकेटेड कोकनट
1 कप मिल्क पावडर
5-6 केसर काड्या
1/2 कप पिठीसाखर
पिस्ते व डेसिकेटेड कोकनट सजावटी करीता
कृती: एका नॉनस्टिक पॅनमध्ये दूध व केसर गरम करायला ठेवा. दूध गरम झालेकी त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट घालून मिक्स करा. डेसिकेटेड कोकनट मिस्क केल्यावर मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागेल. मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये मिल्क पावडर घालून मिक्स करा 1-2 मिनिट मिश्रण विस्तवावर तसेच ठेवा. घट्ट झालेकी विस्तव बंद करा.
मग मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या. थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर व वेलची पावडर घालून मिक्स करून लिंबा एव्हडे गोळे बनवून थोडे चपटे करा.
एका बाउलमध्ये डेसिकेटेड कोकनट घेवून एक पेढा घेवून त्यामध्ये घोळून प्लेटमध्ये ठेवा. अश्या प्रकारे सर्व पेढे बनवून घेवून प्लेटमध्ये ठेवा. प्रतेक पेढ्याला वरतून पिस्ता लावा त्यामुळे आपले पेढे अगदी आकर्षक दिसतील.
पेढे तयार झाले की नेवेद्य म्हणजेच भोग दाखवा.