मोड आलेल्या मसूरची आमटी कोकणी व सीकेपी पद्धतीने
Mod Alelya Masoor Chi Spicy Amti Kokani And CKP Style
मोड आलेली कडधान्य आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत. मोड आलेल्या मसूरची आमटी खूप टेस्टी लागते. आपल्याला वरण भात खायचा कंटाळा आलतर अश्या प्रकारच्या टेस्टी चविष्ट आमटी बनवा. आपण दोन प्रकारे मसूरची आमटी बनवणार आहोत.
कोकणी पद्धतीने आमटी ही लाल मसाला बनवून बनवणार आहोत तर सीकेपी पद्धतीने आमटी आपण हिरवा मसाला वापरुन बनवणार आहोत दोन्ही पद्धतीने आमटी मस्त लागतात.
The Marathi language video of this Mod Alelya Masoor Chi Kokani And CKP Style Spicy Amti Recipe can be seen on our YouTube Channel: Mod Alelya Masoor Chi Kokani And CKP Style Spicy Amti
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
कोकणी पद्धतीने आमटी:
साहीत्य:
1 कप मोड आलेले मसूर
1/2 टे स्पून तेल
1/4 टी स्पून हिंग
1 छोटा कांदा (बारीक चिरून)
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून गरम मसाला
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
1 आमसुल
मीठ चवीने
कोकणी मसाला करिता:
1 टे स्पून तेल
1 छोटा कांदा
7-8 लसूण पाकळ्या
1/2” आले तुकडा
1/2 कप नारळ (खोवून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
कोकणी आमटी करीता कृती: प्रथम मोड आलेले मसूर कुकरमध्ये दोन शीट्या काढून घ्या. कांदा व कोथबिर चिरून घ्या.
मसाला करिता: कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये कांदा लसूण व आले घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये खोवलेला नारळ घालून 2-3 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. नारळाचा रंग थोडा गुलाबी आलाकी त्यामध्ये लाल मिरची पावडर घालून मिक्स करून एक मिनिट परतून घ्या. विस्तव बंद करून मसाला थोडा थंड झालकी थोडे पाणी घालून मसाला चांगला वाटून घ्या.
कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये हिंग व चिरलेला कांदा घालून थोडा परतून त्यामध्ये शिजवलेले मसूर (मसूर थोडे हातानी कुस्करून घ्या) घालून वाटलेला मसाला, गरम मसाला व मीठ घालून मिक्स करून 1 कप किंवा लागेल तेव्हडे पाणी घालून मंद विस्तवावर मसाला शिजवून घ्या.
मसाला शिजला की त्यामध्ये आमसुल व कोथबिर घालून आमटी खाली उतरवून गरम गरम भाता बरोबर सर्व्ह करा.
सीकेपी पद्धतीने हिरव्या मसाल्याची आमटी:
साहीत्य:
1 कप मोड आलेले मसूर
1 टे स्पून तेल
1/4 टी स्पून हिंग
1 छोटा कांदा (बारीक चिरून)
1/4 टी स्पून हळद
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1 आमसुल
मीठ चवीने
हिरव्या मसाल्याकरिता:
1/2 कप कोथबिर (धुवून चिरून)
7-8 लसूण पाकळ्या
1/2” आले तुकडा
2 मध्यम आकाराच्या मिरच्या
1 टी स्पून बडीशेप
1 टी स्पून शहाजिरे
सीकेपी पद्धतीने हिरव्या मसाल्याची आमटी कृती: प्रथम मसूर कुकरमध्ये दोन शिट्या काढून शिजवून घ्या.हिरवा मसाला बारीक वाटून घ्या.
एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये हिंग व चिरलेला कांदा घालून थोडा परतून घ्या मग त्यामध्ये वाटलेला हिरवा मसाला घालून मंद विस्तवावर 5 मिनिट परतून घ्या. मसाला अगदी कोरडा झाला पाहिजे मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला घालून शिजवलेले मसूर घाला मिक्स करून 1 कप पाणी किंवा लागेल तसे पाणी घालून मीठ घालून मसाला मंद विस्तवावर 5-7 मिनिट शिजू द्या. मसाला शिजला की त्यामध्ये आमसुल घालून विस्तव बंद करा. गरम आमटी भाता बरोबर सर्व्ह करा.