स्वीट कॉर्न व्हेज राईस किंवा कॉर्न व्हेज पुलाव
Sweet Corn Rice Sweet Corn Pulao Restaurant Style
स्वीट कॉर्नचा सीझन आलाकी आपण त्यापासून नानाविध डिश बनवतो. ह्या अगोदर आपण स्वीट कॉर्न पाटवडी, सूप, ग्रेव्ही, कटलेट अश्या डिश पाहिल्या आता आपण टेस्टी स्वीट कॉर्न राईस पाहूया बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे तसेच आकर्षक सुद्धा दिसतो.
स्वीट कॉर्न राईस बनवतांना मक्याचे कोवळे दाणे व भाज्या वापरल्या आहेत. त्यामुळे अश्या प्रकारचा राईस हेल्दि आहे.
The Marathi language video of this Sweet Corn Rice Sweet Corn Pulao Restaurant Style can be seen on our YouTube Channel: Sweet Corn Rice Sweet Corn Pulao Restaurant Style
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1 कप बासमती तांदूळ
1/2 कप स्वीट कॉर्न दाणे
2 टे स्पून गाजर (बारीक चिरून)
2 टे स्पून शिमला मिर्च (बारीक चिरून)
2 टे स्पून बीन्स (चिरून)
1 टी स्पून आले (उभे पातळ चिरून)
1 टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
2 लवंग
1 मसाला वेलची (सोलून)
1 तमाल पत्र
1 दालचीनी तुकडा
7-8 मिरे

कृती: प्रथम तांदूळ धुवून बाजूला ठेवा. गाजर, शिमला मिर्च, बीन्स चिरून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, लवंग, तमाल पत्र, दालचीनी, मसाला वेलची सोलून , मिरे घालून चिरलेल्या भाज्या घालून दोन मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये स्वीट कॉर्न दाणे घालून एक मिनिट परतून घ्या.
मग त्यामध्ये धूतलेले तांदूळ, मीठ घालून 2 कप पाणी घालून मिक्स करून पॅनवर झाकण ठेवून 4-5 मिनिट मध्यम विस्तवावर भात शिजवून घ्या. मग झाकण काढून हळुवार पणे बात हलवून परत झाकण ठेवून 4-5 मिनिट मंद विस्तवावर भात शिजवून घ्या. स्वीट कॉर्न राइस शिजलाकी विस्तव बंद करून तासच 10 मिनिट झाकून ठेवा.
स्वीट कॉर्न राईस आता सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे.