गरमा गरम टेस्टी क्रीम ऑफ मशरूम सूप
Tasty Healthy Cream of Mushroom Soup
मशरूम ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत. मशरूम मध्ये पोषक तत्व आहेत. मशरूम मध्ये बीटा ग्लाइसीन व लिनॉलिक एसिड आहे. तसेच प्रोस्टेट व ब्रेस्ट कैंसर च्या आजारपासून दूर ठेवतात. मशरूमच्या सेवनाने वजन कमी होते.
मशरूम मध्ये कार्बोहाइड्रेट्स आहे त्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल मध्ये ठेवण्यास मदत होते. डायबिटीज असणाऱ्याना मशरूमचे सेवन करणे फाययदेशीर आहे.
शरीरातील इम्युनिटी पावर वाढून सर्दी खोकला पासून दूर देवते. ह्या मध्ये न्यूट्रिएंट्स व एंजाइम हृदय रोगांपासून दूर ठेवते.
कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण भरपूर आहे त्यामुळे मशरूम चे सेवन केल्याने अपचन गॅस व एसिडिटी च्या समस्या दूर होतात.
क्रीम ऑफ मशरूम सूप हे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे.
The Marathi language video of this Tasty Healthy Cream of Mushroom Soup can be seen on our YouTube Channel: Tasty Healthy Cream of Mushroom Soup
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहीत्य:
1 कप मशरूम (बारीक चिरून)
1 कप मशरूम (उभे पातळ चिरून)
1 टे बटर किंवा तूप किंवा तेल
1 छोटा कांदा (बारीक चिरून)
4 लसूण पाकळ्या (चिरून)
2 टे स्पून कॉर्न फ्लोर
1 टी स्पून मिरे पावडर
1 टे स्पून फ्रेश क्रीम
मीठ चवीने
1 टे स्पून कोथबिर (चिरून)
कृती: प्रथम मशरूम धवून घ्या. साधारण 10 मशरूम लागतील. त्यातील 5 मशरूम बारीक चिरून घ्या व बाकीचे मशरूम उभे पातळ चिरून घ्या. कांदा व कोथबिर बारीक चिरून घ्या. कॉर्न फ्लोर ½ वाटी पाण्यात मिक्स करून घ्या.
एक पॅनमध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा व लसूण घालून थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये बारीक चिरलेले मशरूम घालून एक मिनिट परतून घेऊन 4 कप पाणी घालून उकळी आलीकी त्यामध्ये उभे चिरलेले मशरूम घालून, कॉर्न फ्लोरचे मिश्रण घालून 2-3 मिनिट शिजवून मग त्यामध्ये मिरे पावडर, मीठ व फ्रेश क्रीम घालून मिक्स करून बाउलमध्ये काढून वरतून कोथबीरीने सजवा.
गरम गरम टेस्टी क्रीम ऑफ मशरूम सूप सर्व्ह करा.