स्वादिष्ट ढाबा स्टाइल दाल फ्राई
Tasty Spicy Punjabi Dhaba Style Dal Fry
डाळ फ्राय ही पंजाबी लोकांची अगदी आवडती व लोकप्रिय डिश आहे. आपण ढाबाच्या जवळ गेलोकी आपल्याला खमंग पारंपारिक पद्धतीने बनवलेले डाळ फ्राय ह्याचा सुगंध येत असतो. मग आपल्याला त्याच्या अगदी डाळ फ्राय व जिरा राईस अगदी कधी खातो असे होते.
आपल्याला भाता बरोबर नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने आमटी, वरण किंवा डाळ लागत असते. ह्या सगळ्याचा कंटाळा आला तर मसूरच्या डाळीचे डाळ फ्राय बनवा. मसूरच्या डाळीचे डाळ फ्राय अगदी हॉटेल सारखे किंवा ढाबा वर बनवतात अगदी तसे होते. डाळ फ्राय बनवायला अगदी सोपे आहे व झटपट होणारे आहे.
टेस्टी स्पायसी मसूरच्या डाळीचे डाळ फ्राय टेस्टी लागते आपण जिरा राईस बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video of this Tasty Spicy Dhaba Style Dal Fry can be seen on our YouTube Channel: Tasty Spicy Punjabi Dhaba Style Dal Fry
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1 वाटी मसूर डाळ (शिजलेली)
1 छोटा कांदा (उभा पातळ चिरून)
2 टे स्पून टोमॅटो (बारीक चिरून)
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
2 टे स्पून कोथबिर (बारीक चिरून)
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 तमाल पत्र
2 लाल सुक्या मिरच्या
1 चक्रीफूल
1-2 लवंग
1 छोटा तुकडा दालचीनी
1 टी स्पून शहाजिरे
4-6 काळे मिरे
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
कृती: प्रथम मसूरची डाळ धुवून कुकरमध्ये दोन शिट्या काढून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या. टोमॅटो व कोथबिर चिरून घ्या. आल-लसूण बारीक वाटून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमाल पत्र, लवंग, दालचीनी, लाल मिरची, मिरे, शहाजिरे, चक्रफूल, हिंग घालून खमंग फोडणी झालीकी त्यामध्ये कांदा घालून छान गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो घालून परतून हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला घालून थोडे पाणी घाला मग चांगली उकळी आलिकी त्यामध्ये शिजलेली डाळ घालून मीठ घालून थोडे पाणी घालून चांगली उकळी आलिकी कोथबिर घालून मिक्स करून विस्तव बंद करा.
गरम गरम डाळ फ्राय जिरा राईस बरोबर सर्व्ह करा.