अधिक मास पुरुषोत्तम मास महत्व व दानधर्म
Adhik Maas Mahatwa Dandharm In Marathi
The Marathi language video of Adhik Maas Mahatwa Dandharm can be seen on our YouTube Channel: Adhik Maas Mahatwa Dandharm
2020 हे वर्ष लिप वर्ष आहे ह्या वर्षी 165 वर्षा नंतर हा संयोग येत आहे की पितृपक्ष झाल्यावर 1 महिन्या नंतर नवरात्र येत आहे.
प्रतेक वर्षी पितृ पक्ष समाप्त झाल्यावर दुसऱ्या दिवशी पासून नवरात्र चालू होते व 9 दिवस घट स्थापना करून पूजा केली जाते. म्हणजेच पितृ अमावस्या झाली की लगेच दुसऱ्या दिवशी प्रतिपदा च्या बरोबर शारदीय नवरात्र चालू होते. पण ह्या वर्षी तसे नाही. ह्या वर्षी श्राद्ध समाप्ती झालीकी लगेच अधिकमास चालू होत आहे. अधिक मास चालू होणार असल्यामुळे नवरात्र व पितृ पक्ष ह्यामध्ये 1 महिन्याचे अंतर आहे. अधिक महिना संपून व नवरात्र आरंभ होणे हा संयोग ह्या वर्षी 165 वर्षा नंतर येत आहे.
त्यामुळे चातुर्मास चा काळ सुद्धा वाढणार आहे. कारण ह्या वर्षी लिप वर्ष होत आहे. त्यामुळे दरवर्षी चातुर्मास चार महिन्याचा असतो तो आता ह्या वर्षी 5 महिन्याचा होणार आहे. ज्योतिष शास्त्र नुसार 160 वर्षा नंतर लिप वर्ष व अधिक महिना एकाच वर्षात येत आहे.
अधिक महिन्याच्या काळामध्ये विवाह, मुंज, कान टोंचणे, गृह प्रवेश ह्या सारखे मंगल कार्य होत नाही. ह्या काळात फक्त पूजा पाठ, व्रत, उपवास व साधना ह्याला विशेष महत्व आहे. कारण ह्या काळात देव विश्रांती घेत असतात असे म्हणतात. देव उठनी एकादशी नंतरच देव जागृत होतात असे म्हणतात.
ह्या वर्षी 17 सप्टेंबर 2020 ह्या दिवशी अमावस्या झाल्यावर श्राद्ध समाप्ती होणार आहे. मग पुढच्या दिवसा पासून अधिक महिना चालू होणार असून 16 ऑक्टोबर 2020 पर्यन्त चालू राहणार. मग 17 ऑक्टोबर 2020 पासून नवरात्री व्रत चालू होत असून 25 नव्हेंबर 2020 ला देव उठनी एकादशी येत आहे. मगच चातुर मास संपणार आहे. मगच कोणतेही शुभ कार्य , विवाह, मुंज, किंवा गृह प्रवेश करू शकतो. म्हणन ह्या वर्षी दसरा, दिवाळी एक महिना लांबली आहे.
अधिक मास ह्या काळात भगवान विष्णु ह्याची आराधना करणे हे खूप महत्वपूर्ण मानले आजे. ह्या काळात विष्णु भगवान ह्याची आराधना केली तर दास पटीने आपल्याला चांगले फळ मिळते.
हिंदू पंचांग नुसार दर तीन वर्षानी चंद्र व सूर्य ह्याच्या मधील संतुलन साधण्यासाठी अधिक महिना येतो अधिक महिना म्हणजे 13 वा महिना आहे.
अधिक महिन्यात दान धर्म करावा असे म्हणतात पण दान धर्म करताना गुप्त पणे करावा.
नवीन लग्न झालेली मुलगी असेल तर अधिक महिन्यात घरच्या जावयाचे व मुलीचे कोड कौतुक केले जाते. मुलीला व जावयाला मुलीचे पालक घरी जेवायला बोलवतात तसेच जावयाला सोन्याच किंवा चांदीच तबक दिल जात. त्याबरोबर चांदीचा दिवा व विष्णु भगवान यांची प्रतिमा देण्याची पद्धत आहे. मुलीची खणा नारळाने ओटी भरतात.
जावयाला विष्णु स्वरूप मानून दान दिले जाते. पण सोन्याची वस्तु किंवा चांदीची वस्तु दान देण हे अलीकडच्या काळात प्रथा आली आहे. पूर्वीच्या काळी पुरणाचे धोंडे बनवून सुग्रास जेवण बनवून जेवायला बोलवण्याची पद्धत होती तसेच ताटात 33 अनारसे किंवा बत्तासे घालून दिले जायचे पण आता कालांतराने सर्व बदलत चालले आहे. त्यापेक्षा अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, श्रम दान, रक्तदान, अर्थदान, ग्रंथ दान करून गरजू लोकाना मदत करावी. हेच सर्वात मोठे दान होईल.