अपराजिता (गोकर्ण) फुलाचे औषधी गुणधर्म
Aparajita Fulache (Gokarni) Aushadhi Gundharm In Marathi
The Marathi language video of Aparajita Fulache (Gokarni) Aushadhi Gundharm can be seen on our YouTube Channel: Aparajita Fulache (Gokarni) Aushadhi Gundharm
आपण आपल्या घराच्या भोवतालच्या बागेत किंवा बाल्कनीत कुंड्यामद्धे विविध फुलाची झाडे लावतो त्यामुळे शोभा सुद्धा वाढते. आपल्या बागेत अपराजिता ह्या फुलाचे झाड लावले तर त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत तसेच त्याचे ज्योतिष शास्त्रा नुसार सुद्धा अनेक फायदे आहेत. अपराजिता म्हणजेच मराठीमध्ये गोकर्ण असे म्हणतात. ह्या मध्ये पांढरी किंवा निळ्या रंगाची फुले आहेत. पण निळ्या रंगाच्या फुलाला जास्त महत्व आहे. कारण देवताना अपराजिताचे फूल खूप प्रिय आहे.
अपराजिताचे झाड खूप नाजुक असते. व पावसाळ्याच्या सीझनमध्ये ह्याला फुले येतात. ह्या फुलाचा आकार गाईच्या कानासारखा असतो त्यामुळे त्याला गोकर्ण असे म्हणतात. तसेच अपराजिताचा अर्थ कधीही पराजय न होणारे म्हणजेच अपराजिता.
अपराजिताचे झाड खूप गुणकारी आहे. त्याच्या पानांचा, फुलांचा व जडाचा औषध बनवण्यासाठी आयुर्वेद मध्ये खूप उपयोग होतो. असाध्य रोज बरे करण्यासाठी ह्या फुलांचा उपयोग केला जातो.
1. अपराजिताचे बीज डोकेदुखीवर उपयोगी आहे. तसेच त्याच्या सेवनाने बुद्धी सुद्धा वाढते. तसेच वात, पित्त, कफ सुद्धा दूर होतो. अपराजितामुळे शरीरावर आलेली सूज सुद्धा कमी होते.
2. अपराजिताच्या की मुळाचे सरबत बनवले जाते. हे सरबत रोज थोडे थोडे पिण्याने सर्दी, खोकला, श्वासाचे त्रास, केसांच्या तक्रारी वर उपयोगी आहे.
3. गर्भवती महिलांच्या डिलेवहरिच्या वेळी अपराजिताच्या वेल कमरे भोवती गुंडाळले तर डिलेवहरी अगदी सहज होते.
4. अपराजिताच्या पानांची पेस्ट बनवून सांधे दुखीवर लावलीतर आराम मिळतो.
5. ज्यांना मधुमेह आहे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अपराजिता प्रयोग करा कारण त्यामध्ये एंटी-डायबेटिक गुण आहेत.
6. जर साप चवलातर त्याचे विश काढण्यासाठी औषधा बरोबर अपराजिताच्या मुळाची पावडर दुधा बरोबर देतात.
7. जर विंचू चवला तर चावलेल्या जागी अपराजिताची पाने चोळून त्यावर पाने बंधावीत. म्हणजे त्रास कमी होतो.
8. अपराजिताचे अजून बरेच औषधी गुणधर्म आहेत.