फक्त 1 मोरपंख वास्तुदोष दूर करून किस्मत बदलते
Fakat 1 Mor Pankh Vastu Dosh Dur Kare kismat Badalti
फक्त एक मोरपंख खूप कामाचे आहे ते घरातील वास्तु दोष कसे दूर करते ते पाहू या. त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत.
मोर हा खूप सुंदर पक्षी आहे. ज्योतिष, वास्तु, धर्म, पुराण व संस्कृति मध्ये मोर ह्या पक्षाला खूप महत्व आहे. मोऱ्यांच्या पंखा विषयी आपण बघणार आहोत.
The Marathi language video of this Fakat 1 Mor Pankh Vastu Dosh Dur Kare kismat Badalti can be seen on our YouTube Channel: Fakat 1 Mor Pankh Vastu Dosh Dur Kare kismat Badalti
1. मोर, मयूर, पिकॉक किती सुंदर नाव आहेत. जेव्हा आकाशात ढग येतात तेव्हा मोराला खूप आनंद होतो व तो आपला पिसारा फुलवून नाचायला लागतो तेव्हा खूप सुंदर दृश बघून खूप आनंद होतो. जसा मोर हा सुंदर पक्षी आहे तसेच त्याच्या पिसाचे खूप फायदे सुद्धा आहेत. आपल्या देवी देवता यांना खूप प्रिय आहे. मां सरस्वती, श्रीकृष्ण, मां लक्ष्मी, इन्द्र देव, कार्तिकेय, श्री गणेश सर्वाना मोर पंख कोणत्याना कोणत्या रूपात प्रिय आहे. पूर्वीच्या काळी महर्षि मोर पिसाचे कलम बनवून त्याने मोठ मोठे ग्रंथ लिहायची पद्धत होती.
2. मोर ह्या विषयी असे मानतात की मोराचे पीस घरात ठेवले की नकारात्मक शक्ति म्हणजेच नेहेटीव्ह एनर्जी नष्ट करते. म्हणून बरेचजण आपल्या घरात मोर पीस लावून ठेवतात.
3. मोर पीसाचे महत्व आपल्या भारतात खूप आहे. कारण ते जास्त प्रभावशाली आहे. व त्याचे चांगले परिणाम लगेच दिसून येतात.
4.ग्रीक लोक मोराच्या पिसाला स्वर्ग व चांदण्या ह्या दृष्टी कोणातून पहातात.
5. हिंदू धर्म मध्ये मोर ह्या पक्षाला धनाची देवी लक्ष्मी व विद्या ची देवी सरस्वती असे मानले जाते.
6. लक्ष्मीची सौभाग्य, खुशहाली,धन धान्य व संपन्नता च्या साठी पूजा केली जाते. तसेच मोऱ्याच्या पांखाचा उपयोग लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जातो. घरात श्री कृष्णाच्या बासरीवर मोर पंख लावून ठेवले तर घरातील प्रेम संबंध छान राहतात.
7. एशिया खंडातील देशांमध्ये मोऱ्याच्या पांखाला अध्यात्म च्या रूपात मानले जाते.
8. जर तुमच्या वैवाहिक जीवन मध्ये तनाव आहे तर बेडरूममध्ये एक मोर पीस लावा त्यामुळे दोघान मधील प्रेम संबंध वाढेल.
9 जर कोणा बरोबरची शत्रुता समाप्त करायची असेल तर श्री हनुमान जीनचा डोक्या वरचा शेंदूर घेऊन शत्रूचे नाव मोर पिसावर लिहावे व मोर पिस आपल्या देवघरात ठेवावे. हा प्रयोग फक्त मंगळवार किंवा शनिवारच्या रात्रि करावा व दुसऱ्या दिवशी सकाळी ते मोर पीस पाण्यात विसर्जित करावे.
10. वास्तुशास्त्र नुसार घराच्या दक्षिण दिशेला पैशाची तिजोरी ठेवून त्यावर मोरपिस उभे केले तर पैशाची कमतरता होत नाही.
11. जर राहु ह्या ग्रहाचा दोष असेल तर मोरपिस घराच्या पूर्वी व उत्तर पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावावे.
12. जर तुमच्या घरात मोरपिस असेल तर तुमच्या घरात वाईट शक्ति कधी येत नाही व घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जावून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
13. वास्तुशास्त्र नुसार मोरपंख घरात लावल्याने घरातील दोष नष्ट होतात.
14. आर्थिक लाभ होण्यासाठी मोरपिस घेऊन ते राधा कृष्ण मंदिरात जावून कृष्ण भगवानच्या मुकूटावर 40 दिवस मोर पिस लावून मग घरी आणून लॉकर किंवा तिजोरी मध्ये ठेवावे.
15. वाईट नजरे पासून वाचण्यासाठी लहान मुलांच्या गळ्यात चांदीच्या तावीजमध्ये मोरपिस ठेवून तो तावीज गळ्यात घालावा.
16. घराच्या मुख्य दरवाजावर 3 मोरपंख लाऊन ॐ द्वारपालाय नम: जाग्रय स्थापयै स्वाहा हा मंत्र लिहावा व त्याच्या खाली गणपती चा फोटो लावावा.
17. बौद्ध धर्म नुसार मोर आपले सर्व पंख उघडतो. त्या नुसार आपले मन व विचार खुले होतात.
18. ईसाई धर्म मध्ये मोर चे पंख, अमरता, पुनर्जीवन व अध्यात्मिक शिक्षाच्या संबंधित आहे.
19. इस्लाम धर्म मध्ये मोराचे सुंदर पंख स्वर्गाच्या दाराच्या बाहेरील बगीचाचे प्रतीक मानतात.
20. मोरपिस घरात लावल्याणी अजून एक फायदा होतो तो म्हणजे घरात किडे मकोडे येत नाहीत.